आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; … तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमचा सध्याचा जॉब सोडून नव्या ठिकाणी रुजू  होणे देखील परवडणार नाही. तुम्ही कंपनीचा नोटीस पिरियड पूर्ण न करताच इतर ठिकाणी जॉईन झालात तर तुमच्या वेतनावर जीएसटी आकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; ... तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमचा सध्याचा जॉब सोडून नव्या ठिकाणी रुजू  होणे देखील महाग होणार आहे. तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या कंपनीमधून चांगल्या पगाराची ऑफर असेल आणि तुम्ही जर तुमचा सध्याचा जॉब सोडून तीकडे जॉईन करणार असाल, तर त्यापूर्वी तुम्ही सध्या जिथे जॉब करत आहात त्या कंपनीचा नोटीस पिरियड तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. नोटीस पिरियड पूर्ण न करताच तुम्ही जर नवीन ठिकाणी रुजू झालात तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशाप्रकारे नोटीस पीरियडचा कालावधी पूर्ण न करताच नोकरी सोडली तर तुम्हाला आता नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ओमान रिफायनरी प्रकरणात निर्णय

भारत पेट्रोलियमची सहाय्यक कंपनी असलेल्या ओमान रिफायनरीच्या प्रकरणात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणाने या पद्धतीचा निर्णय दिला आहे. त्यानुसार कंपन्या भरत असलेले टेलिफोन बिल, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ग्रुप इन्शुरन्स, नोटीस पीरियडच्या बदल्यात दिले जाणारे वेतन अशा सगळय़ा गोष्टी जीएसटीच्या अखत्यारीत येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निकालानुसार नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत असल्याने त्यावर 18 टक्के कर आकारला जाण्याची शक्यता आहे.

कोणाला बसणार फटका

या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे, विशेष:  आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे जॉब बदलण्याचे प्रमाणत सर्वाधिक असते. अशा वेळी त्यांनी जर नोटीस पीरियड पूर्ण न करता  जॉब सोडला तर त्यांच्या वेतनावर जीएसटी आकारण्यात येणार आहे. अनेक कंपन्या दुसऱ्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे काम करण्यासाठी आकर्षक ऑफर देत असतात. अशावेळी अनेक कर्मचारी हे पूर्वीच्या कंपनीचा नोटीस पीरियड पूर्ण न करताच दुसऱ्या कंपन्यामध्ये जॉईन होतात.  मात्र आता अशा कर्मचाऱ्यांकडून जीएसटी वसूल केला जाणार असल्या्मुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

संबंधित बातम्या

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI