कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाचे भाव वाढले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 0.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले

नवी दिल्ली : Petrol Diesel Price Today आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाचे भाव वाढले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 0.51 टक्क्यांची वाढ झाली असून, कच्च्या तेलाचे दर 73.45 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगावर ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनचा बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी झाल्या होत्या. त्या प्रति बॅरल 82 डॉरलवरून 69 डॉलरवर आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा तेजी आल्याचे पहायाला मिळत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जरी वाढ झाली असली, तरी देखील भारतामध्ये पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहे.

महिनाभरापासून पेट्रोल, डिझेल स्थिर 

गेल्या महिन्याभरापासून भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यतंरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. आता किमती वाढल्यानंतर देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे. 4 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

सावधान! रेटिंग पाहून वस्तुची ऑनलाईन खरेदी करता? …तर होऊ शकते फसवणूक

पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8.8 कोटी LPG गॅस कनेक्शन जारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI