Gold Price Today: चांगली संधी! सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

| Updated on: Aug 06, 2021 | 12:58 PM

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपयांवर आले. यासह चांदीमध्येही मोठी घसरण दिसून आली.

Gold Price Today: चांगली संधी! सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Gold Price
Follow us on

नवी दिल्ली : सोने-चांदीचे भाव आज शुक्रवारी 06 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा कमी झालेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपयांवर आले. यासह चांदीमध्येही मोठी घसरण दिसून आली.

10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

आज चांदीची किंमत

जर चांदीबद्दल बोलायचे झाल्यास आज त्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली. आज 1 किलो चांदीची किंमत 0.41 टक्के घसरल्यानंतर 66,720 रुपयांवर आली.

सोने 90,000 रुपयांची पातळी ओलांडणार

कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरणाच्या गतीमध्ये वाढ झाल्यामुळे जगभरात सोन्याच्या किमतीत वाढ झाली. दरम्यान 25 कोटी डॉलरच्या क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणारे डिएगो पॅरिला म्हणतात की, पुढील 3-5 वर्षांत सोन्याचे भाव दुप्पट होतील. या दरम्यान सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 3000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून डिएगोचा अंदाज समजून घेतला तर पुढील 5 वर्षांत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 90,000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care app’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये जर सामानाचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळला तर ग्राहक त्याबद्दल लगेच तक्रार करू शकतो. या अॅपद्वारे (गोल्ड), ग्राहकाला तक्रार नोंदवण्याची माहितीही लगेच मिळेल.

संबंधित बातम्या

RBI Monetary Policy Updates: RBIकडून सातव्यांदा रेपो रेट जैसे थेच, रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही

सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम

Gold Price Today: Good Opportunity! Gold once again became cheaper, check the price of 10 grams of gold