Gold Price Today: सोन्याचे नवीन दर जारी, त्वरित तपासा 10 ग्रॅमची किंमत

2020 बद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर गेली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8077 रुपयांनी स्वस्त आहे.

Gold Price Today: सोन्याचे नवीन दर जारी, त्वरित तपासा 10 ग्रॅमची किंमत
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 12:43 PM

नवी दिल्ली : दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच सोने-चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळतंय. असे असूनही सातत्याने वाढ होत असतानाही सोने विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळतंय. जर तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर लवकर करा. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत 0.34 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी चांदीच्या दरात 0.96 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.

सोने विक्रमी उच्चांकापेक्षा 8077 रुपये स्वस्त

2020 बद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर गेली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8077 रुपयांनी स्वस्त आहे.

सोने-चांदीचा भाव काय?

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.34 टक्क्यांनी वाढून 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात 0.96 टक्क्यांनी वाढ झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 63,571 रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता, यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

संबंधित बातम्या

बनावट वेबसाईटपासून सावधान, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

10000 रुपयांच्या SIP मुळे आपल्याला महिना 9 लाख पेन्शन मिळू शकते, पण कशी?