
आज २८ डिसेंबर रविवारला सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रती १०० ग्रॅमवर ६०,००० रुपयांची वाढ झाली होती. यासोबतच आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून सोन्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याची वाढती मागणी असतानाच त्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे सोन्याच्या किंमती सतत नवे विक्रम मोडत आहेत. चला पाहूया सोन्याच्या किंमतींमध्ये आज किती वाढ झाली आहे?
एमसीएक्सवर सोन्याचा भाव
आज देशात २२ कॅरेट सोन्याची किंमत १२९,४५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी १४१,२२० रुपये आहे. आज एमसीएक्सवर ट्रेडिंग बंद असल्याने यात सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसू शकत नाही. शुक्रवारी गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यापारी दिवशी एमसीएक्सवर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याची किंमत ०.०५ टक्के वाढून १३९,९४० रुपयांवर बंद झाली. त्याचप्रमाणे मार्च २०२६ डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव ७.६६ टक्के वाढून २४०,९३५ रुपयांवर बंद झाला.
या शहरांमध्ये आज सोन्याचा भाव
-मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याची किंमत १२९,४५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १४१,२२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
-हैदराबादमध्ये आज २२ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी १२९,४५० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी १४१,२२० रुपये आहे.
-बंगळुरूत आज २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १२९,४५० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १४१,२२० रुपये आहे.
-कोलकाता, केरळ, पुणे येथेही आज मुंबईप्रमाणेच २२ कॅरेट सोन्याची किंमत १२९,४५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १४१,२२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
-दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १४१,३७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत येथे प्रति १० ग्रॅमनुसार १२०,९६० रुपये आहे.