Gold Rate : अवघ्या 24 तासातच सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव ऐकून थक्क व्हाल

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने १ लाख ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, जो विक्रमी आहे. गेल्या २४ तासांत सोन्यात ११०० रुपयांची आणि चांदीत ३००० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांतील सोन्या-चांदीच्या दरांची तुलना आणि भारतातील सोन्याच्या किमती ठरवण्यातील घटक याविषयी माहिती या लेखात आहे.

Gold Rate : अवघ्या 24 तासातच सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव ऐकून थक्क व्हाल
सोन्या-चांदीचे दर
Image Credit source: social media
| Updated on: Sep 01, 2025 | 1:43 PM

भारतीय संस्कृतीत अतिशय लोकप्रिय असलेलं सोनं हे फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित नाही तर गुंतवणूक आणि बचतीचा उत्तम मार्ग म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. सध्या सणासुदीच्या काळात तर सोनं खरेदीला उधाण येतं. गेल्या काही महिन्यांपासून सटासट वाढत जाणारे सोन्याचे दर पाहून छाती दडपून जाते, पण सोनखरेदीचा लोकांचा उत्साह काही कमी होती नाही. त्यामुळे हाच ट्रेंड कायम राखत आजही सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली असून अवघ्या 24 तासांत सोन्याची किंमत दणकन वर गेली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दारात आज पुन्हा मोठी वाढ झाली असून सोन्या-चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1100 रूपयांची वाढ झाली तर चांदी तब्बल 3 हजार रुपयांनी महागली आहे. जीएसटीसहित सोन्याचे दर प्रती तोळा 1 लाख 7 हजार 738 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीती किंमत जीएसटी सहित प्रति किलो 1 लाख 27 हजार 720 रुपयांवर गेली आहे. थक्क करणारे हे भाव असूनही खरेदीसाठी अनेक ठिकाणई झुंबड उडाल्याचे दिसत आहे.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने एक लाख 7 हजारांचा आकडा ओलांडला आहे तर चांदी 1 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दारात सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 6 हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव वाढता वाढता वाढे, असेच आहेत.

दिल्लीत भाव काय ?

दरम्यान आज दिल्लीत 24 कॅरेट सोनं हे एक तोळ्यासाठी 1,02,509 रुपये आणि 22 कॅरेट सोने 96,340 रुपये प्रती तोळा या दराने उपलब्ध आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,02,494 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96,190 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 02 हजार 509 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती तोळ्यासाठी 96 हजार 190 रुपये इतकी आहे.

चांदीचे दर काय ?

Silver Price In India Today – आज देशात काही ठिकाणी चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदीचा दर प्रति किलो 1,24,900 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यापेक्षा ही किंमत 100 रुपयांनी कमी आहे.

भारतात कशी ठरते सोन्याची किंमत ?

भारतातील सोने आणि चांदीचे दर अनेक आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून असतात:

आंतरराष्ट्रीय बाजार: जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीतील चढ-उतारांचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतो.

डॉलर-रुपया विनिमय दर : रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याची आयात महाग होते, ज्यामुळे देशांतर्गत किमती वाढतात.

आयात शुल्क आणि कर: सरकारने लादलेले कर आणि शुल्क यांचादेखील सोन्याच्या दरांवर परिणाम होतो.

स्थानिक मागणी: लग्न आणि सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढल्यामुळे, दर वाढतात.