Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या…

| Updated on: Oct 26, 2020 | 4:50 PM

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोनं स्वस्त झालं तर चांदीच्या किंमती वधारल्याचं आहेत.

1 / 8
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज(MCX)वर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सणासुदीत ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

2 / 8
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदीच्या किमती वधारल्या आहेत. शुक्रवारी सोन्याचे भाव 75 रुपयांनी घसरत 51,069 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. यावेळी चांदीची किंमत 121 रुपयांनी वधारत 62,933 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती.

3 / 8
आज बाजार उघडताच सुरुवातीला एमसीएक्सवर डिसेंबरमधील सोन्याचे भाव  0.12 टक्क्यांनी वधारत 50,825 प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. ऑक्टोबरच्या पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते. पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वधारूही शकतात.

4 / 8
पहिल्या सत्रामध्ये सोन्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती तर चांदीमध्ये 0.3 टक्क्यांनी घसरण झाली. याआधी गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,144 रुपयांवर बंद झाले होते.

5 / 8
पुढच्या महिन्यात दिवाळीपर्यंत  सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅमला 55000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. सणासुदीत वाढती मागणीमुळे लक्षात घेता अनेक ठिकाणी डीलर्स जास्त दर आकारतात. शुक्रवारी एमसीएक्सवरील सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 50,866 रुपये होते, तर चांदी 62,425 रुपये प्रति किलो झाली.

6 / 8
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव घसरल्याचं पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. अमेरिकेमध्ये प्रोत्साहन पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे डॉलरची किंमत वाढली आहे.

7 / 8
सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली नाही. कारण अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसची रेकॉर्ड ब्रेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे याचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे.

8 / 8
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्धही भडकलं आहे, त्याचाही सोन्या-चांदीच्या किमतीवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.