दागिने बनवायचे असतील तर उशिर करू नका, सोन्या-चांदीचे भाव घसरले

| Updated on: Jan 22, 2021 | 3:18 PM

ज्या स्त्रियांना सोन्याचे दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

दागिने बनवायचे असतील तर उशिर करू नका, सोन्या-चांदीचे भाव घसरले
Follow us on

नवी दिल्ली : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या स्त्रियांना सोन्याचे दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांवर पोहोचली आहे. म्हणून सोनं खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. (gold rate today falling gold silver prices jewelry demand increase in wedding season)

सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाल्यामुळे खरेदीदार खूश आहेत. अशात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत, या महिन्यात लोक दागिन्यांसाठी अधिक मागणी करत आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे कोणीही दागिन्यांकडे फार भर दिला नाही. पण आता लसीकरण सुरू झाल्यामुळे त्यात मकर संक्रांतीनंतर सोन्याची मागणी पुन्हा वाढली आहे.

सोन्याची मागणी आणखी वाढेल

पुढच्या 3-4 महिने सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते मे या कालावधीत लग्नाचा शुभ काळ असतो. त्यामुळे जूनपर्यंत सोनं खरेदी अशी सुरू राहिल. सध्या सोन्या-चांदीची किंमत कमी होत असल्याने लोक अगोदरच दागिन्यांची ऑर्डर देत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमध्ये अनेक विवाह थांबले होते. यावेळी लस येण्याची शक्यताही कमी होती. त्यामुळे लोकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली. पण आता पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं आहे.

काय आहे आजचा सोन्याच भाव?

MCX वर आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे (Gold-Silver Rate Decreases). सकाळी 10 वाजता 5 फेब्रुवारीच्या सोन्यात 83 रुपयांची घट होऊन सोनं 49 हजार 365 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. आज सकाळी सोनं 93 रुपयांनी घसरुन 49 हजार 355 रुपयांवर उघडलं. गुरुवारी हे 49 हजार 448 रुपयांवर बंद झालं होतं. त्यासोबतच एप्रिलचं सोनं (Gold rate today) सध्या 56 रुपयांनी घसरुन 49 हजार 540 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 35 रुपयांची घसरुन होऊन 49 हजार 561 रुपयांवर उघडलं. गुरुवारी हा 49 हजार 596 रुपयांवर बंद झालं होतं.

चांदीच्या दरातही सध्या घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 मार्चच्या चांदीमध्ये 475 रुपयांची घसरण होऊन चांदी 66 हजार 825 रुपए प्रति किलोग्रामवर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 300 रुपयांची घसरण होऊन 67 हजार रुपयांवर उघडलं. गुरुवारी चांदी 67 हजार 300 रुपयांच्या स्तरावर बंद झाली होती. मेच्या चांदीमध्ये 497 रुपयांची घसरण होऊन 67 हजार 665 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज सकाळी यामध्ये 427 रुपयांची घसरण होऊन 67 हजार 735 रुपयांच्या स्तरावर उघडली होती. गुरुवारी ही 68 हजार 162 रुपयांवर बंद झाली होती.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव प्रति तोळा

मुंबई – 50,300

नागपूर – 49,610

पुणे – 49,610

नाशिक – 49,610

जळगाव – 49,610

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील चांदीचा भाव प्रति किलोग्राम

मुंबई – 67,400

नागपूर – 67,400

पुणे – 67,400

नाशिक – 67,400

जळगाव – 67,400

सोन्याचा भाव माहित असूद्या…

जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा

तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

दागिने विकत घेताना बिल घ्यायला विसरू नका

जर तुम्ही सोनं किंवा चांदीचं दागिने विकत घेत असाल तर ज्वेलरकडून बिल नक्का घ्या. यामध्ये सोन्याची शुद्धता आणि दर याची माहिती असते. तुमच्याकडे बिल असेल तर तुम्ही सोन्या-चांदीची विक्री करताना बोलणीसुद्धा करू शकता. जर बिल नसेल तर दागिने मनमानी किंमतीनं विकावे लागतील. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. (gold rate today falling gold silver prices jewelry demand increase in wedding season)

संबंधित बातम्या :

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

(gold rate today falling gold silver prices jewelry demand increase in wedding season)