Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची हीच ती वेळ… अमेरिकेतून मोठा झटका… दोन दिवसात भाव धडाम… आताच करा घाई

Gold-Silver Price : अमेरिकेतील महागाईमुळे सोन्या-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दोन दिवसांत चांदी 12,600 तर सोने 2000 नी स्वस्त झाले आहे. सणासुदीच्या काळात ही खरेदीची उत्तम संधी असून, ग्राहकांसाठी सोनं-चांदी स्वस्तात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. जागतिक घडामोडींचा हा परिणाम आहे.

Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची हीच ती वेळ... अमेरिकेतून मोठा झटका... दोन दिवसात भाव धडाम... आताच करा घाई
gold
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 1:00 PM

अमेरिकेतून मोठा झटका बसताच कमोडिटी मार्केटपासून सराफा बाजारापर्यंत सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसातच चांदीचे भाव 12,600 रुपयाने कोसळले आहेत. तर सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आजही MCXवर सोन्या-चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोनं आणि चांदीचे भाव कोसळल्याने ग्राहकांसाठी सोनं चांदी खरेदी करण्याची हीच संधी आहे. मात्र, बाजारात सोन्या चांदीच्या भावात कधीपर्यंत घसरण राहील हे अद्याप समोर आलेलं नाही.

सोनं किती स्वस्त झालं?

MCX वर आज शुक्रवारी सोन्याचा भाव 1200 रुपयाने घसरला आहे. आज सोन्याचा भाव 150695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदीचे भाव 2600 रुपये कमी झाले असून चांदी आज 2,30,270 रुपये प्रति किलोवर आली आहे. विशेष म्हणजे काल गुरुवारीही सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती.

2 दिवसात 12,600 रुपयांची घसरण

MCXवर गुरुवारी चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण झाली. तर सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली. दोन दिवसात सोनं 2000 रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदी 12,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर हे दर घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडलं?

ग्‍लोबल मार्केटमध्ये गोल्‍डमध्ये 1.32 टक्क्यांची घसरण होऊन सोने 4,401.74 डॉलर प्रति औंस झाले आहे. तर चांदीच्या भावात 5.45 टक्के घसरण झाल्याने चांदी 64.908 डॉलर प्रति औंसवर होती.

अमेरिकेतून झटका

सोन्या चांदीच्या भावात झालेल्या घसरणी मागे अमेरिकेतील महागाईचे आकडे आहेत. अमेरिकेतील महागाईचे मजबूत आकडे समोर आले आहेत. त्यामुळे फेड रिझर्व्ह व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. परिणामी रेट वाढण्याची शक्यता 80 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्या चांदीच्या भावावर त्याचा परिणाम झाला आहे, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कच्चे तेल महागले

नफा वसूलीमुळेही सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, डॉलर अधिक मजबूत होताना दिसत आहे. कारण जिो पॉलिटिकल तणावामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. Brent Crude Oil 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

(टीप- सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या. )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us