AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Strike Today : ग्राहकांनो ! घरातून निघण्यापूर्वी… आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर

आजपासून सरकारी बँकांचा 3 दिवसांचा संप सुरू झाला असून, पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. यामुळे गणेशोत्सवापूर्वी ग्राहकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्टेट बँक ते कॅनरा बँक सर्व सरकारी शाखा बंद राहतील, पण खासगी बँका व डिजिटल व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

Bank Strike Today : ग्राहकांनो ! घरातून निघण्यापूर्वी... आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर
Bank StrikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 12:13 PM
Share

Bank Strike Today : आजपासून तीन दिवस बँकिंग सेक्टरसाठी बऱ्याच घडामोडींचा दिवस असणार आहे. देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने ही संपाची हाक दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे. पण त्यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच बँक कर्मचारी संपावर गेल्याने तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठी अडचण होणार आहे.

या देशव्यापी बंदचा सर्वाधिक परिणाम सरकारी बँकांच्या कामकाजांवर होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टटे बँक ऑफ इंडियापासून पंजाब नॅशनल बँकेपर्यंतच्या सर्व सरकारी बँकांना टाळे लागलेले आहेत. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन यूको बँकेसहीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्येही आजपासून तीन दिवस कामकाज ठप्प राहणार आहे. ब्रँचमध्ये कॅश जमा करणे, ड्राफ्ट बनवणे, पैसे काढण्यापासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. कर्जाशी संबंधित कामांवरही परिणाम झाला आहे. काऊंटरवर कोणतीच सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांना आल्या पावली घरी परतावे लागत आहे.

प्रायव्हेट बँकेची स्थिती काय?

एकीकडे सरकारी बँकेमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. तर दुसरीकडे काही ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. देशातील सर्वच खासगी बँका संपापासून दूर आहेत. तुमचं बँक खातं एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, येस बँक वा इंडसइंड बँकेत असेल तर तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता थेट या बँकांच्या शाखेत जाऊन तुमचे व्यवहार करू शकता. या खासगी बँकांची कामे नेहमी सारखी सुरळीत सुरू आहेत. काही खासगी बँकांमध्ये कर्मचारी संघटनांची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संपाचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. कोऑपरेटिव्ह बँकांची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. स्थानिक कर्मचारी संघटनांच्या निर्णयावर कोऑपरेटिव्ह बँकांचे कामकाज अवलंबून आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोऑपरेटिव्ह बँकेत फोन करून बँक चालू आहे की नाही याची खात्री करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

डीजिटल व्यवहारांवर परिणाम नाही

दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा डीजिटल बँकिंग सेवांवर कोणताच परिणाम झालेला नाही. तुम्ही यूपीआय सेवा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगने तुम्ही घरी बसल्या व्यवहार करू शकता. एटीएम मशीनही सुरू आहेत. मात्र, कॅश रिफिलिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या कॅशची आवश्यकता असेल तर सावधगिरी बाळगा.

तीन दिवस त्रास

तीन दिवस बँकांचा संप असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास होणार आहे. उद्या 12 सप्टेंबर रोजी शनिवार आहे. हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. याचा अर्थ आता बँका थेट सोमवारी उघडणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता डीजिटल माध्यमातूनच आपले आर्थिक व्यवहार उरकावे लागणार आहेत.

अमरावतीत घोषणाबाजी

दरम्यान, राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसत आहेत. अमरावतीच्या राजकमल चौकात बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सरकारने आश्वासन पाळलं नाही. आरबीआय असो, इतर संस्था असतील किंवा राज्य सरकारचे कार्यालये असो या सर्व ठिकाणी पाच दिवसांचा आठवडा आहे. मग आम्हालाच पाच दिवसांचा आठवडा का नाही? असा सवाल बँक कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल, असा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Follow Us
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर