Gold Price : सोन्या चांदीबाबतचं नवं भाकीत, एक्सपर्टच्या दाव्याने झोपच उडाली

सोन्या-चांदीच्या दरात सध्या घसरण सुरू असून, 2027 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत ती कायम राहील. त्यानंतर मात्र दरात मोठी वाढ अपेक्षित आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि डॉलरची मजबूती सध्या दबाव आणत असली तरी, दीर्घकाळात केंद्रीय बँकांची खरेदी किमतींना आधार देईल, असे तज्ञांचे भाकीत आहे. MCX वर सोन्याचा भाव 1.12 लाख ते 1.35 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 1.40 लाख ते 1.90 लाख प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

Gold Price : सोन्या चांदीबाबतचं नवं भाकीत, एक्सपर्टच्या दाव्याने झोपच उडाली
Gold Price
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 5:40 PM

गेल्या तीन चार दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली आहे. सोन्या चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही घसरण 2027च्या पहिल्या सहामाहीपर्यंत चालूच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी येणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरांबाबत कठोर धोरण आणि डॉलरची मजबुती निकटच्या भविष्यात सोन्या चांदीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करू शकते. दुसरीकडे, केंद्रीय बँक आणि संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदीदारी दीर्घ काळासाठी किमतीला आाधार देण्याचं काम करू शकतात.

ब्रोकरेज फर्म व्हेंचुराच्या कमोडीटीचे प्रमुख आणि सीआरएम एनएस रामास्वामी यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वााढवणे आणि यील्ड उच्चांकावर राहणार असल्याने सोनेच्या किंमतीवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत होऊ शकतो. 2027च्या मध्यात व्याज दरात कपात आणि यील्डमध्ये नरमाई आल्याने सोन्याच्या किमती रिकव्हरमोडमध्ये येण्याची शक्यता आहे, असं रामास्वामी यांनी सांगितलं.

Loading...

तिमाहीचा अंदाज काय?

रामास्वामी यांनी सोन्याच्या किंमतीवर तिमाहीच्या आधाराने अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, 2027च्या पहिल्या तिमाहीत सोनं 3,400 ते 3,700 डॉलर प्रति औंस, दुसऱ्या तिमाहीत 3,600 ते 4,000 डॉलर प्रति औंसच्या आसपास राहू सकतं. तिसऱ्या तिमाहीत त्याची किमत 4,200 ते 4,800 डॉलर आणि चौथ्या तिमाहीत 4,900 ते 5,200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

किती स्वस्त होईल?

पीएल कॅपिटल कमोडिटीजचे प्रमुख आशिष राजोदिया यांनीही अंदाज वर्तवला आहे. सोने आणि चांदी मोठ्या घसरणीनंतर 2027मध्ये प्रवेश करत आहे. यावेळी एमसीएक्सवर सोन्याचा भाव सुमारे 1.20 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 1.40 लाख रुपये प्रति किलोग्रॅमच्या आसपास आहे, असं राजोदिया यांनी सांगितलं. मात्र, सोन्याच्या विक्रीत फ्यूचर्स फंड्स आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ करण्याची महत्त्वाची भूमिका आहे, असं ते म्हणाले.

त्यांच्या बेस केसच्या अंदाजानुसार, पुढच्या सहा महिन्यात सोन्याची किंमत 1,12,000 ते 1,35,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास राहू शकते. डॉलरच्या तुलनेत हा अंदाज 3,200 ते 3,900 डॉलर प्रति औंस आहे. दुसरीकडे 12 महिन्यात व्याज दर वाढवण्याचा दबाव कमी झाल्यावर सोन्याची किमत 1,20,000 ते 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. डॉलरची ही मर्यादा 3,450 ते 4,300 डॉलर प्रति औंस राहमण्याचा अंदाज आहे.

असा असेल अंदाज

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये 2027 च्या पहिल्या सहामाहीतही कमकुवतपणा राहण्याची शक्यता आहे. मात्र, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर आणि डॉलरची मजबुती यांचा येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतो.

MCX वर पुढील सहा महिन्यांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.12 लाख ते 1.35 लाख रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

चांदीमध्ये जास्त चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पुढील 12 महिन्यांत तिचा भाव प्रति किलो 1.40 लाख ते 1.90 लाख रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us