Rohit Pawar: MHT- CET परीक्षेत कशी झाली डील? रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; थेट पुरावे दाखवले!
स्टिंग ऑपरेशन, डेटा लिक प्रकरण तसेच २०२७ च्या परीक्षेतसुद्धा आतापासून होत असलेला घोळ याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत सर्व पुरावे सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे, असं रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी MHT-CET परिक्षेमधील गैरप्रकारांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याचसंदर्भात आज रोहित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परीक्षामधील घोटाळ्यांचे पुरावेच आयुक्तांना दिले आहेत. तसेच यासंदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या भेटीनंतर रोहित पवार यांनी ट्वीट करुन परीक्षांमधील घोटाळ्यांसंदर्भावरुन मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
“राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या MHT- CET परिक्षेतील गैरप्रकरांबाबत घोटाळेबाज कंपन्या कशा पद्धतीने पैसे घेऊन प्रवेश मॅनेज करत आहेत. याचे स्टिंग ऑपरेशन, डेटा लिक प्रकरण तसेच २०२७ च्या परीक्षेतसुद्धा आतापासून होत असलेला घोळ याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत सर्व पुरावे सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
सोबत जोडलेल्या QR मध्ये सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ आहेत, ते सर्वानी नक्की ऐकावेत. एवढे पुरावे सादर करूनही सरकार साधी FIR देखील नोंद करत नाही, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे घोळ होत असतील, तर हे नक्कीच शोभणारे नाही. या गोष्टी थांबणार नसतील, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि एकंदरीतच राज्याचे नेतृत्वच निष्क्रिय आहे, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, या उच्च तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भोंदू खरातसमोर पार वाकून नमस्कार करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा तरी कशी करायची, असा खोचक सवालही आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या MHT- CET परिक्षेतील गैरप्रकरांबाबत घोटाळेबाज कंपन्या कशा पद्धतीने पैसे घेऊन प्रवेश मॅनेज करत आहेत याचे स्टिंग ऑपरेशन, डेटा लिक प्रकरण तसेच २०२७ च्या परीक्षेतसुद्धा आतापासून होत असलेला घोळ याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत सर्व पुरावे सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे.
सोबत जोडलेल्या QR मध्ये सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ आहेत, ते सर्वानी नक्की ऐकावेत. एवढे पुरावे सादर करूनही सरकार साधी FIR देखील नोंद करत नाही, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे घोळ होत असतील, तर हे नक्कीच शोभणारे नाही. या गोष्टी थांबणार नसतील, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि एकंदरीतच राज्याचे नेतृत्वच निष्क्रिय आहे, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, या उच्च तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भोंदू खरातसमोर पार वाकून नमस्कार करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा तरी कशी करायची?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 26, 2026
दरम्यान, रोहित पवार यांनी ट्वीट करत चार- पाच कथित ऑडियो क्लीप दाखवले आहेत, ज्यामध्ये विविध परिक्षांमधील गैरप्रकाराची डील होताना दिसत आहे. परीक्षांचे सेंटर, पाहिजे तसे मार्क्स याबाबत या ऑडियो क्लीपमध्ये चर्चा होताना दिसत आहे. काम झाल्यानंतर पैसे द्या, असंही या ऑडियो क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे. (टीव्ही ९ मराठी या ऑडियो क्लीप्सची पुष्ठी करत नाही)
