AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : छोट्या टीमविरुद्ध तोडफोड, लंकेविरुद्ध मात्र खेळ खल्लास; डबल सेंच्युरी ठोकणारा वैभव 27 बॉलमध्येच आऊट

मागील सामन्यात अवघ्या 52 बॉलमध्ये द्विशतक झळकावून क्रिकेटविश्वाला थक्क करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला श्रीलंकेविरुद्ध मात्र मोठी खेळी करता आली नाही. 4 फोर आणि 3 सिक्स मारल्यानंतर 27 बॉलमध्ये 40 रनवर त्याची खेळी संपली. त्यामुळे आता अभिषेक शर्मा आणि कर्णधार तिलक वर्मावर भारताची धावसंख्या पुढे नेण्याची जबाबदारी आहे.

Vaibhav Sooryavanshi : छोट्या टीमविरुद्ध तोडफोड, लंकेविरुद्ध मात्र खेळ खल्लास; डबल सेंच्युरी ठोकणारा वैभव 27 बॉलमध्येच आऊट
Vaibhav Sooryavanshi 40 runsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 5:24 PM
Share

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या सेमीफायनमध्ये युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध त्याला पाहिजे तशी खेळी करता आली नाही. अलीकडेच आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या वैभवला या महत्त्वाच्या सामन्यात 40 धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. महत्वाचं म्हणजे सुरुवातीला सावध खेळी सुरु केल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेतला होता. पण मोठी खेळी साकारण्यापूर्वीच वैभव आऊट झाला.

वैभवची आक्रमक सुरुवात, पण 40 धावांवर विकेट

श्रीलंकाविरुद्ध वैभव सूर्यवंशीने सुरुवातीला संयम दाखवला. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये धावांचा वेग चांगलाच वाढवलेला. पहिल्या 8 षटकांत भारतीय संघाने 80 धावा फटकावल्या. वैभवने 27 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 फोर आणि 3 सिक्स मारले. त्याचा स्ट्राइक रेट 148.14 इतका होता.

मात्र, आठव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रीलंकेचा गोलंदाज जनिथ लियानागेने त्याला बाद केले. लियानागेने शॉर्ट टप्प्याचा वेगवान बॉल टाकला. हा बॉल अपेक्षेपेक्षा अधिक उसळल्याने वैभवचा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅटचा योग्य संपर्क न झाल्याने बॉल मिड-ऑनच्या दिशेने गेला. तिथे लसिथ क्रुस्पुलने मागे धावत झेल टिपला आणि वैभवला माघारी धाडलं.

मोठ्या सामन्यांमध्ये वैभवची बॅट तळपली, पण यावेळी…

वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीची ताकद दाखवली आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याआधी उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध 68 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये 97, तर गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायरमध्ये 96 धावा केल्या होत्या.

तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ विरुद्ध त्याने 94 धावांची खेळी केली होती. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सेंट्रल झोनविरुद्ध 92 आणि 40 धावा, तर अंतिम सामन्यात दक्षिण विभागाविरुद्ध 44 आणि 8 धावा केल्या होत्या. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध 38 धावा, तर पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात 15 धावा केल्या होत्या.

अशा प्रकारे मोठ्या सामन्यांमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या वैभवकडून श्रीलंका ‘अ’ विरुद्ध पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, यावेळी त्याची खेळी 40 धावांवरच थांबली. त्यामुळे द्विशतकी खेळीच्या हिरोला रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत मोठी खेळी साकारता आली नाही.

Follow Us
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?