Gold Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

| Updated on: Jun 03, 2021 | 12:45 PM

गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी वाढून 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. (Gold-Silver Price Today 03 June 2021)

Gold Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold-Price
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत (Gold price) 0.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी वाढून 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. ज्यात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,700 रुपये इतकी झाली होती. तर चांदी 0.60 टक्क्यांनी वधारली होती. (Gold-Silver Price Today 03 June 2021)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमतीत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यात भारतातील 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 5 हजार रुपयांनी वधारले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर 56,200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

सोने-चांदीची नवी किंमत

गुरुवारी, MCX वर सोन्याचा भाव 66 रुपयांच्या उच्चांकासह 49,220 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,907.67 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पाच महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने हे पाच महिन्याच्या उच्च स्तरावर 1,916.40 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे.

अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात मऊपणामुळे सोन्याला आधार मिळाला आहे. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या ट्रेझरीचे उत्पादन 1.60 टक्क्यांपेक्षा खाली गेले आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे.

तर चांदीची किंमत 102 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 72,780 रुपये इतका झाला आहे. गेल्या सत्रात चांदीची किंमत ही 0.6 टक्क्यांनी वाढला होता.

सोन्याच्या मागणीत वाढ

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरमध्ये कमकुवतपणा, किंमती वाढवणे, कोरोनाची तिसरी लाट यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.

सोने-चांदी का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची स्पॉट किंमत आज किरकोळ कमी झाली. मंगळवारी यूएस यील्डमध्ये वाढ झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होत आहे. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, व्यापारी आणि गुंतवणूकदार यूएस फेडच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

तिसर्‍या हप्त्याची विक्री आजपासून सुरू

सॉवरेन गोल्ड बाँड स्कीमच्या (Sovereign Gold Bond Scheme) तिसर्‍या हप्त्याची विक्री सुरू झाली. 4 जूनपर्यंत गोल्ड बाँड योजना खुली राहील. तिसर्‍या मालिकेची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,889 रुपये आहे. पहिल्या हप्त्यासाठी गोल्ड बाँडची किंमत 4,777 रुपये आणि दुसर्‍या हप्त्यासाठी 4,842 रुपये प्रति ग्रॅम आहे. डिजिटल पेमेंटवरील इश्यू किमतीवर गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. (Gold-Silver Price Today 03 June 2021)

संबंधित बातम्या :  

Salary Hike : पगार वाढल्यानंतर लगेचच करा ‘ही’ कामं, पगारवाढीचा आनंद होईल दुप्पट

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Double Good News, पगारवाढीपाठोपाठ प्रमोशनही होणार