Gold Price Today : सोनं घ्यायचं की थांबायचं ? खरेदीला जाण्यापूर्वी आजचा 1 तोळ्याचा भाव तर बघा
Gold Rate Today 11 August 2026 Latest News Updates in Marathi : सोन्याची चमक तर आज फिकी झाली आहे, पण चांदीच्या दरांनी सर्वांना घाम फोडला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोनं आणि चांदीचे दर किती ते जाणून घेऊया.

Gold Rate Today in India : सध्या सुरू असलेला भू-राजकीय तणाव, त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सोन्याची चमक चांगलीच फिकी पडली आहे. एवढंच नव्हे तर औद्योगिक मागणीत नरमाई आल्याने चांदीच्या दरावरही चांगलाच दबाव दिसून आला आहे. सोन्याच्या दराबाबात विचार करायचा झाला तर, दोन दिवसांत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 390 रुपयांनी तर 22 कॅरेटचं सोनं 360 रुपयांनी स्वस्त झालंय. मात्र याआधी 9 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर स्थिर राहण्यापूर्वी सलग चार दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 8,350 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 7,650 रुपयांची वाढ झाली होती. आज ( मंगळवार 11 ऑगस्ट) सोन्याचे दर पहायला गेले तर सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात आज प्रत्येकी 10 रुपयांची किरकोळ घसरण झाल्याचं दिसून आलं.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किती?
देशातील 10 मोठ्या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे, जाणून घेऊया.
| शहर | 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव | 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव | 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव |
| दिल्ली | ₹1,52,110 | ₹1,39,440 | ₹1,14,120 |
| मुंबई | ₹1,51,960 | ₹1,39,290 | ₹1,13,970 |
| कोलकाता | ₹1,51,960 | ₹1,39,290 | ₹1,13,970 |
| चेन्नई | ₹1,52,170 | ₹1,39,490 | ₹1,17,640 |
| बंगळुरू | ₹1,51,960 | ₹1,39,290 | ₹1,13,970 |
| हैदराबाद | ₹1,51,960 | ₹1,39,290 | ₹1,13,970 |
| लखनऊ | ₹1,52,110 | ₹1,39,440 | ₹1,14,120 |
| पाटणा | ₹1,52,010 | ₹1,39,340 | ₹1,14,020 |
| जयपुर | ₹1,52,110 | ₹1,39,440 | ₹1,14,120 |
| अहमदाबाद | ₹1,52,010 | ₹1,39,340 | ₹1,14,020 |
तीन दिवस स्थिर राहिल्यावर चांदीचे भावही खाली
सोनं तर आज खाली आलंच पण चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. सलग तीन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज चांदी स्वस्त झाली. एक किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज एक किलो चांदी 100 रुपयांनी स्वस्त होऊन तिचा भाव 2,44,900 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. देशातील इतर प्रमुख महानगरांबद्दल सांगायचं झालं तर, मुंबई आणि कोलकात्यामध्येही 1 किलो चांदीसाठी 2,44,900 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, असं असलं तरी चेन्नईमध्ये चांदीचे दर सर्वाधिक असून तिथे 1 किलो चांदीची किंमत 2,49,900 रुपये आहे. म्हणजेच देशातील चार प्रमुख महानगरांपैकी चेन्नईत चांदीचा दर सर्वाधिक आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे ईबीजी कमोडिटी अँड करन्सी रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरात अल्पावधीत पुन्हा तेजी पाहायला मिळू शकते. त्यांच्या अंदाजानुसार, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.57 लाख रुपये, तर एक किलो चांदीचा भाव 2.80 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर, एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी रिसर्च अॅनालिस्ट आणि उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांच्या सांगण्यानुसार, सोन्याच्या तेजीला अमेरिकेतील लेबर मार्केटमधील कमकुवत आकडेवारी, डॉलरमधील नरमाई आणि फेडरल रिझर्व्हकडून अधिक मवाळ आर्थिक धोरणाची अपेक्षा यांचा आधार मिळाला आहे. आता या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या अपेक्षांमधील बदल, डॉलरची स्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर असेल. या घटकांचा सोन्या-चांदीच्या दरांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.