Gold-Silver Rate Today 13 March 2026 : गुड न्यूज गुड न्यूज ! सोनं खरेदीसाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस नाहीच ! नवे दर पाहून व्हाल थक्क, 10 ग्रॅम सोनं…

Gold-Silver Rate Today 13 March 2026 Latest News Updates in Marathi: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढउतार सुरू आहेत. मात्र आज बाजारात मोठी उलथापालथ झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर सोने आणि चांदीचे दर...

Gold-Silver Rate Today 13 March 2026 : गुड न्यूज गुड न्यूज ! सोनं खरेदीसाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस नाहीच ! नवे दर पाहून व्हाल थक्क, 10 ग्रॅम सोनं...
सोनं- चांदीचे दर घ्या जाणून
| Updated on: Mar 13, 2026 | 10:43 AM

जागतिक बाजारपेठेतील वाढता राजकीय तणाव तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता सराफा बाजारात दिसून येत आहे. सातत्याने उलथापलाथ होत असलेल्या सराफा बाजारातील आजचे दर समोर आले आहेत. शुक्रवारी MCXवरील सोन्या-चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून आली. विशेष म्हणजेही सलग तिसऱ्या सत्रातील घसरण आहे. पण डॉलर कमकुवत झाल्यामुळे दरात झालेली घसरण फार मोठी नव्हती.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीची किंमत 0.7 टक्के घसरून 2,66,001 प्रति किलो इतकी झाली. तर चांदी पाठोपाठ चमकणारा धातू, सोन्याचा दरही घसरलेला दिसला. सोन्याच्या किंमतीत 0.3 टक्के घसरण होऊन प्रति 10 ग्रॅमसाठी ती किंमत 1,59,764 रुपये इतकी झाली. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात 97 रुपये तर चांदीचे दर 638 रुपयांनी वाढल्याचेही दिसून आलं.

आंतराराष्ट्रीय बाजारात काय घडलं ?

स्थानिक बाजारपेठेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंची घसरण झाली. स्पॉट गोल्ड 0.4 % घसरून 5116डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे, तर स्पॉट सिल्व्हर 0.21 % घसरून 84.72 डॉलर्स प्रति औंसवर वर पोहोचले.

बाजाराचा मूड का बदलला ?

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे, अमेरिकेत व्याजदरात लवकर कपात होण्याची आशा कमकुवत झाली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या वाढीवर काहीसा दबाव आला आहे. शुक्रवारी डॉलर किंचित कमकुवत झाला, ज्यामुळे सोने आणि चांदीसारख्या डॉलर-मूल्यांकित वस्तू इतर देशांमधील गुंतवणूकदारांसाठी अधिक परवडणाऱ्या झाल्या. परिणामी, त्यांची झालेली घसरण ही मर्यादित होती.

इराण- अमेरिका तणावाने वाढली चिंता

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा बाजारावरही परिणाम झाला आहे. तेहरान धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा विचार करू शकते असे संकेत इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी दिले. त्यांच्या या विधानामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. याच दरम्यान, आखातातील तेल टँकरवरील हल्ले आणि इराणकडून आलेल्या इशाऱ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. वाढत्या तेलाच्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आहे.

Follow Us