Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर, सराफा बाजारात.. 10 ग्रॅमचे दर घ्या जाणून

Gold Price Today 15 June 2026 Latest News Updates in Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारात 'स्पॉट गोल्ड'च्या (तात्काळ वितरणासाठी उपलब्ध सोने) दरात २ टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति औंस ४,३०४.११ डॉलर्सवर पोहोचले आहे. अमेरिकन आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक करार झाल्याचे वृत्त आहे; यामुळे तेलाच्या किमतीत घट झाली असून, महागाई आणि उच्च व्याजदरांबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे.

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर, सराफा बाजारात.. 10 ग्रॅमचे दर घ्या जाणून
15 जून रोजू सोन्याचे दर
| Updated on: Jun 15, 2026 | 8:57 AM

देशभरातील ग्राहकांसाठी एक आनंदीच बातमी समोर आली आहे, देशातील सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. सोमवार, 15 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,220 रुपयांपर्यंत खाली आला. गेल्या आठवड्यात 24-कॅरेट सोन्याच्या भावात 6680 रुपयांची घट झाली, तर 22-कॅरेट सोने 3400 ० रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, भारताबाहेर सोन्याचे भाव वाढले आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चे (तात्काळ खरेदी-विक्रीसाठीचे सोने) भाव 2 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 4204.11 डॉलर्सवर पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणच्या मोठ्या संघर्षानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक शांतता कराराबाबत सहमती झाली आहे; यामुळे तेलाच्या किमतीत घट झाली असून महागाई आणि उच्च व्याजदरांबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. ‘ब्रेंट क्रूड ऑईल’चा भाव 3.6 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 83.68 डॉलर्सवर आला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील या करारावर शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘ट्रुथ सोशल’वर या कराराची घोषणा केली.

देशातील महत्वाच्या शहरांतील सोन्याचे भाव

दिल्लीतील सोन्याचे भाव : राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49, 220 रुपये आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,790 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36, 640, तर 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,070 रुपये आहे.

तर चेन्नईमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,51,190 रुपये आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,38,590 रुपये आहे.

पुणे आणि बेंगळुरू ​​या दोन्ही शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,070 रुपये आहे आणि 22 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,640 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 136790 149220
मुंबई 136640 149070
अहमदाबाद 136690 149120
चेन्नई 138590 151190
कोलकाता 136640 149070
हैदराबाद 136640 149070
जयपुर 136790 149220
भोपाळ 136690 149120
लखनऊ 136790 149220
चंदीगड 136790 149220

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली आहे. 15 जूनच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलो 2,59,900 रुपयांपर्यंत खाली आला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 3 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति औंस 70.07 डॉलरवर पोहोचला. सोने आणि चांदीचे देशांतर्गत भाव हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.

Follow Us