Gold Price Today : अधिकमासात सोन्याची खुशखबर, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज10 ग्रॅमचे दर..
आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजाराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, 18 मे रोजी देशात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचे दर हे..

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोन्याच्या आयातीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतक आता चांदीच्या आयातीवर नवीन निर्बंध लागू केलेत. मात्र असं असलं तरीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा लोकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये. दोन्ही धातूंचे भाव गगनाला भिडले असले तरीही सोनं आणि चांदीला अद्यापही मोठी मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे आणि चांदीचे भाव वर चढलेले होते, मध्येच त्यात घसरण झाली तरी खूप परक पडत नव्हता. त्यातच आता कालपासून अधिकमासाला सुरूवात झाली असून यानिमित्ताने सोनं-चांदीच दागिने, वस्तू, आभूषणं यांच्या खेरदीला मोठा वेग येतो. मात्र सध्य़ाचे दर पाहता या वस्तू कशा विकत घेता येणार असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला होता.
मात्र आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजाराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, 18 मे रोजी देशात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. 18 मे रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरात सोन्याचे दर खाली घसरलेले दिसून आले. त्यामुळे अधिकमासाचनिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 18 मे च्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत खाली घसरून 1,57,070 रुपये इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6540 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 6470 रुपयांपर्यत वाढ नोंदवण्यात आली होती.
रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. याशिवाय, अमेरिका आणि इराण यांच्यात अद्याप सलोखा न झाल्यामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वाचा सागरी मार्ग पुन्हा कधी सुरू होणार याबद्दल काहीच संकेत न मिळाल्यामुळे, वाढत्या महागाईची भीती अधिकच वाढली आहे. कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे महागाई वाढू शकते, ज्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
वाढत्या चिंताजनक चलनवाढीच्या दबावामुळे मध्यवर्ती बँकांना प्रमुख व्याजदर अधिक काळासाठी वाढवून ठेवावे लागू शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,488.99 डॉलर्सपर्यंत घसरला, हा 30 मार्च 2026 नंतरचा नीचांकी स्तर आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
दिल्लीत सोन्याची किंमत : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,57,070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट चा भाव 1,43,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.
मुंबई आणि कोलकाता : मुंबई आणि कोलकाता या दोन शहरात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,43,850 रुपयांना तर 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,56,920 रुपयांना मिळत आहे.
चेन्नई मध्ये सोन्याचे दर : 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,910 रुपये असून तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,47,500 रुपये इतका आहे.
पुणे आणि बंगळुरू : या दोन शहरांमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,56,920 रुपये मोजावे लागत असून 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1,43,840 रुपये इतके आहेत.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) |
| दिल्ली | 143990 | 157070 |
| मुंबई | 143840 | 156920 |
| अहमदाबाद | 143890 | 156970 |
| चेन्नई | 147490 | 160900 |
| कोलकाता | 143840 | 156920 |
| हैदराबाद | 143840 | 156920 |
| जयपुर | 143990 | 157070 |
| भोपाळ | 143890 | 156970 |
| लखनऊ | 143990 | 157070 |
| चंदीगड | 143990 | 157070 |
चांदीची किंमत
चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घट होत आहे. 18 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2, 79, 900 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात त्यात 5 हजार रुपयांची वाढ झाली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात भारतातील चांदीच्या किमतीने सर्वाधिक टप्पा गाठला. तेव्हा चांदीची किंमत 4 लाखांच्या पार गेली होती. तर रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आता आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे स्पॉट भाव प्रति औंस 74.30 डॉलरपर्यंत घसरले आहेत.