Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; दोन दिवसांत भावात 1700 ची घसरण
Gold Rate Today 29 July 2026 Latest News Updates in Marathi: सोन्या-चांदीची आज फिकी पडली आहे. देशभरात विविध शहरांत 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..

Gold Rate Today in India : अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह (Fed) 29 जुलै रोजी त्यांचं महत्त्वाचं चलनविषयक धोरण (Monetary Policy) जाहीर करणार आहे. या निर्णयापूर्वी जागतिक गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत असून, मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी झाल्याने चांदीच्या किमतींमध्येही घसरण दिसून येत आहे. याचा परिणाम देशांतर्गत सोन-चांदींच्या किमतींवरही दिसून आला आहे. गेल्या एका दिवसाच्या वाढीनंतर आता सोने सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदवण्यात आली आहे.
दिल्लीत दोन दिवसांत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1700 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1560 रुपयांनी कमी झाला आहे. आजच्या व्यवहारातही घसरण कायम राहिली असून, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन्ही प्रकारच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत आणखी 10 रुपयांची घट झाली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरची वाढती ताकद आणि अमेरिकन फेडच्या आगामी धोरणात्मक निर्णयामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत काहीशी सावधगिरी दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या दरांवर दबाव कायम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव किती ?
देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचे मानले जातात. स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि मागणी-पुरवठ्यानुसार या दरांमध्ये शहरानुसार थोडाफार फरक असू शकतो. भारतातील विविध शहरांत आज 1 तोळा सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..
| शहर | 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर |
| दिल्ली | ₹1,44,310 | ₹1,32,290 | ₹1,08,270 |
| मुंबई | ₹1,44,160 | ₹1,32,140 | ₹1,08,120 |
| कोलकाता | ₹1,44,160 | ₹1,32,140 | ₹1,08,120 |
| चेन्नई ं | ₹1,44,160 | ₹1,32,140 | ₹1,08,120 |
| बेंगलुरू | ₹1,44,160 | ₹1,32,140 | ₹1,08,120 |
| हैदराबाद | ₹1,44,160 | ₹1,32,140 | ₹1,08,120 |
| लखनऊ | ₹1,44,310 | ₹1,32,290 | ₹1,08,270 |
| पटना | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,170 |
| जयपुर | ₹1,44,310 | ₹1,32,290 | ₹1,08,270 |
| अहमदाबाद | ₹1,44,210 | ₹1,32,190 | ₹1,08,170 |
चांदीचीही घसरण सुरूच
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरणीचा कल कायम आहे. सलग दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या दोन दिवसांत एक किलो चांदीच्या दरात एकूण 5100 ची घट झाली आहे. यापूर्वी 25 जून रोजी चांदीच्या किमतीत 5000 रुपयांची वाढ झाली होती, तर 24 जुलै रोजी त्याच प्रमाणात म्हणजे 5000 रुपयांची ची घट झाली होती. या चढ-उतारांमुळे चांदीच्या बाजारात अस्थिरता कायम असल्याचे चित्र आहे. आज दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा दर 100 रुपयांनी घसरून 2,34,900 रुपयांवर आला आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख महानगरांमध्येही चांदीचा दर याच पातळीवर व्यवहारात आहे.
बाजाराची नजर आता कोणत्या घडामोडींवर?
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, येत्या काही दिवसांत जागतिक आर्थिक घडामोडी सोन्या-चांदीच्या किमती ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यांच्या मते, पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती, युरोझोन, जपान आणि अमेरिकेतील महागाईचे आकडे, तसेच अमेरिकेच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचे (GDP) आकडे, ग्राहक विश्वास निर्देशांक (Consumer Confidence Index) आणि साप्ताहिक बेरोजगारी भत्ता अर्जांची (Jobless Claims) आकडेवारी यावर बाजाराचे विशेष लक्ष असेल. तसेच फेडरल रिझर्व्ह (Fed), बँक ऑफ इंग्लंड (BoE) आणि बँक ऑफ जपान (BoJ) यांच्या व्याजदरासंदर्भातील निर्णयांचा जागतिक कमोडिटी बाजारावर थेट परिणाम होऊ शकतो.