AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: 24 आणि 22 कॅरेट सोनं स्वस्त, सात दिवसांनंतर चांदीही घसरली; आजचे भाव किती ?

Gold Rate Today 05 August 2026 Latest News Updates in Marathi : सोन्याची चमक फिकी पडली असून चांदीतही घसरण झाली आहे. प्रमुख शहरांत 24, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅण सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल, तर वाचा ही सविस्तर बातमी..

Gold Price Today: 24 आणि 22 कॅरेट सोनं स्वस्त, सात दिवसांनंतर चांदीही घसरली; आजचे भाव किती ?
5 ऑगस्ट रोजी तुमच्या शहरात सोन्याचे भाव किती ?
| Updated on: Aug 05, 2026 | 9:49 AM
Share

Gold Rate Today in India : सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या संकेतांमुळे जागतिक बाजारात सावध वातावरण निर्माण झालं असून त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून चांदीचे दरही सात दिवसांच्या स्थिरतेनंतर खाली आले आहेत. गेल्या दोन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकूण 230 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. आजच्या व्यवहारात राजधानी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे.

सात दिवसांनी चांदीची चमक फिकी

चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. सलग सात दिवस कोणताही बदल न झाल्यानंतर आज 1 किलो चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. याआधी 28 जुलै रोजी चांदीच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची मोठी घसरण झाली होती. सध्या दिल्लीमध्ये 1 किलो चांदीचा दर 2,34,900 रुपये इतका आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर अद्ययावत करण्यात आले आहेत. शहरानुसार सोन्याच्या किमतींमध्ये कर, स्थानिक शुल्क आणि मागणी-पुरवठ्यानुसार थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासून घेणे महत्वाचं ठरतं.

आजचे रेट्स खालीलप्रमाणे

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 
दिल्ली ₹1,44,140 ₹1,32,140 ₹1,08,140
मुंबई ₹1,43,990 ₹1,31,990 ₹1,07,990
कोलकाता ₹1,43,990 ₹1,31,990 ₹1,07,990
चेन्नई ₹1,43,990 ₹1,31,990 ₹1,10,140
बंगळुरू ₹1,43,990 ₹1,31,990 ₹1,07,990
हैदराबाद ₹1,44,210 ₹1,32,190 ₹1,08,150
लखनऊ ₹1,44,140 ₹1,32,140 ₹1,08,140
पाटणा ₹1,44,040 ₹1,32,040 ₹1,08,040
जयपुर ₹1,44,140 ₹1,32,140 ₹1,08,140
अहमदाबाद ₹1,44,040 ₹1,32,040 ₹1,08,040

सोन्याच्या दरात घसरणीमागे काय कारण ?

बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे व्याजदर कपातीबाबत तातडीने निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी जागतिक गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात अमेरिकेतील नॉन-फार्म पेरोल (Non-Farm Payroll) अहवाल, रोजगार बाजाराशी संबंधित इतर आर्थिक निर्देशांक, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि कच्च्या तेलाच्या किंमती यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल. या सर्व घडामोडींवरून फेडरल रिझर्व्हच्या पुढील व्याजदर धोरणाचा अंदाज बांधला जाईल. यामुळे आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी बाजारातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...