AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गोड बातमी! भाव इतके उतरले

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने आनंदवार्ता आणली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही धातूचा काय रोख असेल ते समजेल. पण ऑक्टोबर महिन्याच्या अंतिम टप्प्यात मौल्यवान धातूने स्वस्ताई आणली आहे. या दिवाळीत सोने-चांदी स्वस्त झाली तर ग्राहकांची चांदी होईल. त्यांना स्वस्त दरात खरेदी करता येईल.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गोड बातमी! भाव इतके उतरले
| Updated on: Nov 01, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीच्या ग्राहकांना ऑक्टोबर हिटची प्रचिती आली. भाव अचानकच कडाडले. 7 ऑक्टोबरनंतर मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतली. सोने-चांदीने 4 हजारांची झेप घेतली. दसऱ्याला स्वस्त सोने-चांदी लूटण्याच्या योजनेला सुरुंग लागला. आता दिवाळीत तरी सोने-चांदीत स्वस्ताई यावी, असी ग्राहकांची इच्छा आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या सत्रात दोन्ही धातूच्या किंमतीत घसरण झाली. सोमवार आणि मंगळवारी किंमतीत घसरण दिसून आली. नोव्हेंबर महिन्यात हाच ट्रेंड कायम राहिला तर सोने-चांदी (Gold Silver Price Today 1 November 2023) खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी उसळेल. येत्या दहा दिवसांत मौल्यवान धातूतील बदल हे चित्र स्पष्ट करेल.

दोन दिवसांत स्वस्ताई

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्यापासून सोन्यात नरमाई आली आहे. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. 28 ऑक्टोबर रोजी किंमती 600 रुपयांची वाढल्याने सोने एक हजारांनी वधारले होते. या आठवड्यात 30 ऑक्टोबर रोजी सोन्यात 230 रुपयांची घसरण झाली. तर मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सोन्यात 550 रुपयांची स्वस्ताई आली. दोन दिवसांत सोने 780 रुपयांनी स्वस्त झाले. आता 22 कॅरेट सोने 56,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची माघार

गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने मुसंडी मारली. चांदीने 1 हजारांची उसळी घेतली. 30 ऑक्टोबर रोजी दरवाढ झाली. पण 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,370 रुपये, 23 कॅरेट 61,124 रुपये, 22 कॅरेट सोने 56,215 रुपये झाले. 18 कॅरेट 46,028 रुपये, 14 कॅरेट सोने 35,902 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 72,165 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद