AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्याची आनंदवार्ता, चांदी चमकली, नोव्हेंबरमध्ये होणार का घसरण?

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत ऑक्टोबर महिन्यात मोठी तफावत दिसून आली. या महिन्याच्या सुरुवातीला घसरणीचे सत्र सुरु होते. त्याला 7 ऑक्टोबरनंतर मोठा ब्रेक लागला. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. 4 हजारांपेक्षा जादा दरवाढ झाली. या आठवड्याची सुरुवातच सोन्यातील नरमाईने झाली. काय आहेत सोने-चांदीचे दर जाणून घ्या..

Gold Silver Rate Today : सोन्याची आनंदवार्ता, चांदी चमकली, नोव्हेंबरमध्ये होणार का घसरण?
| Updated on: Oct 31, 2023 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : ऑक्टोबर महिन्यात खऱ्या अर्थाने सोने-चांदीला चकाकी आली. किंमतींनी तडक उडी घेतली. भावात मोठी वाढ झाली. सोने आणि चांदी 4 हजारांनी महागले. त्यामुळे दसऱ्यात सोने-चांदी खरेदीच्या ग्राहकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. जागतिक मंचावर सध्या दोन युद्ध सुरु आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या मंदीखाली आहे. शेजारील चीन गंटागळ्या खात आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक लागला आहे. युद्धामुळे अनेक देशांनी सोने-चांदीची (Gold Silver Price Today 31 October 2023) मागणी वाढवली आहे. त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात पण दिसून आले. या आठवड्याच्या सुरुवातीला आणि या महिन्याच्या अंतिम टप्यात सोने स्वस्त झाले तर चांदी महागली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मौल्यवान धातूंची काय चाल असेल याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

अचानक सोन्याची माघार

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्याची सुरुवात पण घसरणीनेच झाली होती. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. 28 ऑक्टोबर रोजी किंमती 600 रुपयांची वाढल्याने सोने एक हजारांनी वधारले होते. 30 ऑक्टोबर रोजी सोन्यात 230 रुपयांची घसरण झाली आहे. आता 22 कॅरेट सोने 57,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी वधारली

गेल्या आठवड्यात चांदीत नरमाई होती. किंमतीत सातत्याने घसरण सुरु होती. गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पण चांदीत घसरणीचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तो सपशेल चुकला. चांदीने 1 हजारांची उसळी घेतली. 30 ऑक्टोबर रोजी ही भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,238 रुपये, 23 कॅरेट 60,993 रुपये, 22 कॅरेट सोने 56,094 रुपये झाले. 18 कॅरेट 45,928 रुपये, 14 कॅरेट सोने 35,824 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,931 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.  तज्ज्ञांच्या मते, इस्त्राईल-हमाय युद्ध आणि दिवाळीत मागणी वाढल्याने सोने-चांदीत मोठी घसरण येणार नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत