AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीदारांना सुवर्णसंधी! सोने-चांदी धडपडले, असे घसरले भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत आपटी बार सुरु आहे. ऐन सणासुदीत खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. जागतिक बाजाराचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून येत आहे. पुढील आठवड्यात सोने-चांदी वधारतील की होतील कमी? काय आहेत बाजाराचे संकेत

Gold Silver Rate Today : खरेदीदारांना सुवर्णसंधी! सोने-चांदी धडपडले, असे घसरले भाव
Image Credit source: गुगल
| Updated on: Sep 10, 2023 | 9:28 AM
Share

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : डॉलरच्या खेळीने सोने-चांदीचे पुन्हा पानिपत झाले आहे. जागतिक बाजारात डॉलरने जोरदार मुसंडी मारली आहे. तर अमेरिकेतील महागाई आटोक्यात आल्याचे संकेत मिळत आहे. रोजगाराच्या आघाडीवर पण आनंदवार्ता मिळत आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतीवर दिसून येत आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दहा दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंनी चढाई केली होती. डॉलरचा दबाव झुगारला होता. गुंतवणूकदारांनी सोने-चांदीकडे मोर्चा वळविल्यानेहे संकेत मिळाले होते. पण त्यानंतर पुन्हा सोने-चांदी घसरणीला (Gold Silver Rate Today 10 September 2023) लागले. या आठवड्यात पण दोन्ही धातूंना मोठा प्रभाव दाखविता आला नाही. किंमतीत सतत घसरण सुरु आहे. त्यामुळे अनेकांना पुढील आठवड्यात सोने-चांदीच्या किंमती वाढतील की कमी होतील, याची चिंता लागली आहे. सध्या दोन्ही धातूंमध्ये चांगली स्वस्ताई आली आहे.

काय आहेत संकेत

डॉलर सध्या जागतिक बाजारात मजबूत आहे. अमेरिकेत महागाई आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह, व्याजदर वाढविण्याचे संकेत नाही. त्यामुळे सोने-चांदीच्या आघाडीवर नरमाईचे संकेत मिळत आहेत. बाजारातील तज्ज्ञानुसार जागतिक गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली तर सोने-चांदीत दरवाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्यात घसरणीचे सत्र

गुडरिटर्न्सनुसार, 1 सप्टेंबर सोने स्वस्त झाले. 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भाव जैसे थे होते. 4 सप्टेंबर भाव 100 रुपयांनी वधारले. 5 आणि 6 सप्टेंबरला या दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. 7 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 160 रुपयांनी उतरला. 8 सप्टेंबर रोजी भाव किंचित वधारला. तर 9 सप्टेंबर रोजी 150 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदी 4000 रुपयांनी स्वस्त

सप्टेंबर महिन्यात चांदी 4000 रुपयांनी स्वस्त झाली. ऑगस्ट महिन्यात शेवटच्या सत्रात किंमतीत वाढ झाली होती. 1 सप्टेंबरला 500 रुपयांची, 2 सप्टेंबर रोजी 200, 4 सप्टेंबर रोजी 700, 5 सप्टेंबरला 1000 तर 6 सप्टेंबर रोजी 500 आणि 7 सप्टेंबर रोजी 700 तर 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,171 रुपये, 23 कॅरेट 58,934 रुपये, 22 कॅरेट सोने 54,201 रुपये, 18 कॅरेट 44378 रुपये, 14 कॅरेट सोने 34,615 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 71,017 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?