AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : ग्राहकांचा भांगडा! सोने-चांदीची स्वस्ताई; असा झरझर उतरला भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीतील पडझड ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोने-चांदीत सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीचे सत्र आहे. भाव कमी झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार नाही. सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी उतरली आहे.

Gold Silver Rate Today : ग्राहकांचा भांगडा! सोने-चांदीची स्वस्ताई; असा झरझर उतरला भाव
| Updated on: Jan 11, 2024 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : सोने-चांदीने या आठवड्यात ग्राहकांना पुन्हा दिलासा दिला. सलग तीन दिवसांत मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्या. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी सराफ बाजाराकडे धाव घेतली आहे. 3 जानेवारीपासून सोने-चांदीत पडझड सुरु आहे. मंगळवारी चांदीने किंचित उसळी घेतली होती. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली. हा ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही धातूंच्या किंमती जास्त आहेत. डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर ही पडझड ग्राहकांसाठी फायदेशीर ठरली आहे. अशी आहे सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 11 January 2024)

सोन्याचा तोरा उतरला

नवीन वर्षातील दुसऱ्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारीपासून सोन्याने उसळी घेतलेली नाही. 4 जानेवारी 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला शंभर रुपयांनी किंमत कमी झाली. काल किंमती अपडेट झालेल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने दिला दिलासा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांदीच्या किंमतीत घसरण झाली. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारीला चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांनी किंमत उतरली तर दुसऱ्या दिवशी तितकीच वधारली. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोने 62,348 रुपये, 23 कॅरेट 62,098 रुपये, 22 कॅरेट सोने 57111 रुपये झाले. 18 कॅरेट 46,761 रुपये, 14 कॅरेट सोने 36,474 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,447 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

  1. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  2. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा