AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोनं गुरगुरलं, चांदी नरमली; काय आहेत किंमती, अशी आहे अपडेट

Gold Silver Rate Today : गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीत पडझडीचे सत्र सुरु आहे. सराफा बाजारात त्यामुळे पुन्हा चैतन्य आले आहे. बाजारात गर्दी वाढली आहे. या आठवड्यात पण ही घसरण दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्यात वाढ झाली तर चांदीच्या किंमतीत नरमाई दिसून आली.

Gold Silver Rate Today : सोनं गुरगुरलं, चांदी नरमली; काय आहेत किंमती, अशी आहे अपडेट
| Updated on: Jan 13, 2024 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सराफा बाजाराकडे आपोआप ग्राहकांची पावलं वळली. डिसेंबरमध्ये उच्चांकी कामगिरी केल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला होता. ग्राहक आता सोन्याला प्लॅटिनम पर्याय म्हणून खरेदी करत आहेत. या वर्षी 3 जानेवारीपासून सोने आणि चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. या दहा दिवसांत सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली. त्याचा ग्राहकांनी फायदा घेतला. याआठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने वधारले तर चांदीत नरमाई होती. काय आहेत सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 13 January 2024)

सोन्याने घेतली उसळी

नवीन वर्षाच्या सुरुवातीचे दोन दिवस सोने वधारले. त्यानंतर जवळपास दहा दिवसांचा ब्रेक घेतला. 3 जानेवारीपासून सोने उतरले. 4 जानेवारी 440 रुपये, 5 जानेवारी रोजी 130 रुपये, 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला 100 रुपयांनी तर 11 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. तर 12 जानेवारी रोजी किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत नरमाईचे सत्र

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांदीत नरमाईचे सत्र दिसून आले. 3 जानेवारीला 300 रुपये, 4 जानेवारीला 2000 रुपये, 8 जानेवारीला 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन दिवसांपासून किंमतीत अपडेट आलेली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले तर चांदी स्वस्त झाली . 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57264 रुपये झाले. 18 कॅरेट 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,530 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन