AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 18 September 2024 : मोठ्या भरारीनंतर सोने-चांदी धपकन आपटले, पितृपक्षात इतके स्वस्त झाले भाव

Gold Silver Rate Today 18 September 2024 : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. तर या आठवड्याची सुरुवात पण दणक्यात झाली होती. पितृपक्ष लागताच मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today 18 September 2024 : मोठ्या भरारीनंतर सोने-चांदी धपकन आपटले, पितृपक्षात इतके स्वस्त झाले भाव
पितृपक्ष लागताच भाव झरझर आले खाली
| Updated on: Sep 18, 2024 | 4:37 PM
Share

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यात जोरदार वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी तर चांदी 8,600 रुपयांनी वधारले. आता पितृपक्ष लागताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदविण्यात आली. गणपती विसर्जनापर्यंत मौल्यवान धातूने तुफान बॅटिंग केली होती. पण आता पितृपक्ष लागल्याने खरेदीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे लागलीच बेशकिंमती धातूच्या किंमतीत घसरण झाली. आता काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 18 September 2024 )

सोन्याचा भाव उतरला

गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी वाढले. तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 110 आणि 160 रुपयांनी घसरण झाली. सोने एकूण 270 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 2 हजारांनी माघार

चांदीने गेल्या आठवड्यात 7 हजारांची घौडदौड केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाल होते. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी चांदी प्रत्येकी एक हजारांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,276, 23 कॅरेट 72,983, 22 कॅरेट सोने 67,121 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,957 रुपये, 14 कॅरेट सोने 42,867 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,537 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा