AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सलग तिसऱ्यांदा सोने-चांदीत घसरण, इतक्या कमी झाल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. या स्वस्ताईमुळे ग्राहकांसाठी जणू हा सोनियाचा दिनु ठरला आहे. ऑक्टोबर महिन्यात सोने-चांदीने 4 हजारांची उसळी घेतली होती. या दरवाढीला तीन दिवसांत ब्रेक लागला आहे. दिवाळीपूर्वी जर भाव अजून कमी झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

Gold Silver Rate Today : सलग तिसऱ्यांदा सोने-चांदीत घसरण, इतक्या कमी झाल्या किंमती
| Updated on: Nov 02, 2023 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्यात सलग घसरणीचे सत्र आल्याने ग्राहकांना सुखद धक्का बसला. येत्या काही दिवसांत भाव जर घसरले तर सराफा बाजारात ग्राहकांना मोठा फायदा होईल. ऑक्टोबर महिन्यात हमास-इस्त्राईल हल्ल्याने दरवाढ झाली होती. सोने-चांदीने चार हजारांची लांब उडी घेतली होती. दिवाळीपूर्वी सोने-चांदी स्वस्ताईचा अंदाज व्यक्त होत असताना युद्धाने सर्व समीकरणं बिघडवली. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सोने-चांदीत (Gold Silver Price Today 2 November 2023) जोरदार घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. हा ट्रेंड कायम राहिल्यास दिवाळीत गोडवा वाढणार हे नक्की. तर नवीन दागिन्यांची हौस पण होणार हे तर सांगायलाच नको, नाही का?

स्वस्ताईचे तीन दिवस

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्यापासूनच सोने नरमले. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. 28 ऑक्टोबर रोजी 600 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर सतत घसरण सुरु आहे. या आठवड्यात 30 ऑक्टोबर रोजी सोन्यात 230 रुपयांची घसरण झाली. तर मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सोन्यात 550 रुपयांची स्वस्ताई आली. 1 नोव्हेंबर रोजी किंमतीत 320 रुपयांनी घसरल्या. या तीन दिवसांत सोने 1020 रुपयांनी स्वस्त झाले. आता 22 कॅरेट सोने 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत जोरदार घसरण

गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने मुसंडी मारली. चांदीने 1 हजारांची उसळी घेतली. 30 ऑक्टोबर रोजी दरवाढ झाली. पण 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची घसरण झाली. 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांनी भाव उतरला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,012 रुपये, 23 कॅरेट 60,768 रुपये, 22 कॅरेट सोने 55,887 रुपये झाले. 18 कॅरेट 45,759 रुपये, 14 कॅरेट सोने 35,692 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 70,984 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...