Gold Silver Rate Today 22 November 2024 : थांबायचं नाय गड्या आता थांबायचं नाय, सोने-चांदीने ग्राहकांची उडवली झोप, अशा झरझर वधारल्या किंमती

Gold Silver Rate Today 22 November 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. किंमतीत मोठी वाढ झाली. या चार दिवसात दोन्ही धातुनी कोणतीही उसंत घेतली नाही. आज सकाळच्या सत्रात सुद्धा दरवाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची झोप उडाली आहे.

Gold Silver Rate Today 22 November 2024 : थांबायचं नाय गड्या आता थांबायचं नाय, सोने-चांदीने ग्राहकांची उडवली झोप, अशा झरझर वधारल्या किंमती
जळगाच्या सराफ बाजारात गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने भावात सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. सोने भाव एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत.
| Updated on: Nov 22, 2024 | 8:33 AM

गेल्या चार दिवसांपासून सोने आणि चांदीने दरवाढीचा चौकार लगावला आहे. किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील घसरणीची कसर या आठवड्यात दोन्ही धातुनी वसूल केली. या चार दिवसात गुंतवणूकदारांनी कमाईचा चौकार हाणला. तर ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. या चार दिवसात सोन्याने 2300 रुपयांची भरारी घेतली तर चांदी 2500 रुपयांनी महागली. या किंमतींमुळे ऐन हिवाळ्यात ग्राहकांना घाम फुटला आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 22 November 2024 )

सोने 2300 रुपयांनी वधारले

गेल्या आठवड्यात सोने वधारले नव्हते. या आठवड्यात सलग चार दिवस मोठी वाढ झाली. चार दिवसात 2300 रुपयांनी दर वधारले. सोमवारी 660, मंगळवारी 760 रुपयांची तर बुधवारी सोन्याने 550 रुपयांची दरवाढ झाली. 21 नोव्हेंबर रोजी सोने 300 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2500 रुपयांनी वधारली

मागील दोन आठवड्यात चांदीत नरमाईचे सत्र होते. तर या आठवड्यात चांदीने 2500 रुपयांची मुसंडी मारली. 19 नोव्हेंबर रोजी किंमत 2 हजार रुपयांनी वधारली. 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,932, 23 कॅरेट 76,624, 22 कॅरेट सोने 70,470 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,699 रुपये, 14 कॅरेट सोने 45,005 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,317 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.