AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 September 2024 : पितृपक्षात भावात घसरण नाही उलट वधारले सोने आणि चांदी; दरवाढीची सुरूच राहणार का कहाणी?

Gold Silver Rate Today 22 September 2024 : पितृपक्षात सराफा बाजारात आपोआप ग्राहकांची संख्या कमी होते. सोने आणि चांदीच्या दरात मोठा उलटफेर होत नाही. या पितृपक्षात सुरुवातीला मौल्यवान धातू घसरले. पण आता किंमतींनी उसळी घेतली आहे. दरवाढ कायम राहणार का?

Gold Silver Rate Today 22 September 2024 : पितृपक्षात भावात घसरण नाही उलट वधारले सोने आणि चांदी; दरवाढीची सुरूच राहणार का कहाणी?
पितृपक्षात अजून होणार का सोने आणि चांदीत दरवाढ
| Updated on: Sep 22, 2024 | 8:25 AM
Share

पितृपक्षात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण होत असल्याचे दिसून येते. या काळात ग्राहक मौल्यवान धातूची शक्यतोवर खरेदी करत नाहीत. या आठवड्यात मौल्यवान धातूत सुरुवातीला घसरण दिसली. अखेरच्या टप्प्यात मात्र दोन्ही धातूंनी कमाल उसळी घेतली. पितृपक्षात किंमतीचा आलेख उंचावला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात केल्याने जागतिक बाजारात किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात तुफान आले आहे. दुसरीकडे कच्चा तेलाच्या भाव निच्चांकी पातळीवर आले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी किंमती वधारल्या आहेत. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 22 September 2024 )

सोन्यात दरवाढीची शक्यता

या आठवड्यात सलग तीन दिवस सोन्यात घसरण दिसली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि अखेरच्या सत्रात किंमती उसळल्या. सुरुवातीला 110 रुपये तर तर 20 सप्टेंबर रोजी सोन्याने 660 रुपयांची भरारी घेतली. 21 सप्टेंबर रोजी किंमतीत बदल झाला नाही. पण पुढील आठवड्यात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

घसरणीला वाकुल्या, चांदीची कामगिरी दमदार

पितृपक्षात चांदी घसरली. त्यापूर्वी चांदीत 8 हजार रुपयांची दरवाढ झाली होती. या सोमवारी किंमतीत 1 हजारांची भर पडली. तर अखरेच्या सत्रात 20 सप्टेंबर रोजी चांदी 1500 रुपयांनी महागली. या आठवड्यात चांदी महागण्याची शक्यता आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,093, 23 कॅरेट 73,796, 22 कॅरेट सोने 67,869 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,570 रुपये, 14 कॅरेट सोने 43,344 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,917 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?