जोरदार मुसंडीनंतर सोने आणि चांदी झाले स्वस्त; ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस दिलासा

Gold Silver Rate Today 23 March 2024 | सोने आणि चांदीने गुरुवारी जोरदार मुसंडी मारली. दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर गुरुवारी मौल्यवान धातूंनी हा विक्रम केला होता. त्यामुळे सोने 67,000 रुपयांच्या घरात तर किलोभर चांदीने 75,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता किंमतीत स्वस्ताई आली आहे.

जोरदार मुसंडीनंतर सोने आणि चांदी झाले स्वस्त; ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस दिलासा
सोने आणि चांदीची स्वस्ताई, इतके कमी झाले भाव
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 23, 2024 | 8:36 AM

सोने आणि चांदीने गुरुवारी टॉप गिअर टाकला. किंमती सूसाट धावल्या. सोन्याने तर एकाच दमात 1000 रुपयांची लांब उडी घेतली. चांदीने पण त्याच मार्गाने उसळी घेतली. दोन्ही मौल्यवान धातूंमधील या तेजीने ग्राहक मात्र सैरभैर झाले. सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना मोठा फटका बसला. मार्च महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांत दोन्ही धातूंनी असाच विक्रम गाठीशी बांधला होता. त्यानंतर दोन आठवड्यात किंमतीत चढउताराचे सत्र सुरु होते. हा ट्रेंड 21 मार्च रोजी मोडीत निघाला. आता सोने आणि चांदीत (Gold Silver Price Today 23 March 2024) घसरण झाली आहे. काय आहेत या दोन्ही धातूंच्या किंमती?

  1. सोने झाले इतके स्वस्त – मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोन्याने 3,430 रुपयांची आघाडी घेतली. 10 मार्चनंतर भावाने मोठी झेप घेतली नाही. गेल्या आठवड्यात किंमतीत 620 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात, 18 मार्च रोजी सोने 210 रुपयांनी स्वस्त झाले. 19 मार्च रोजी सोने 460 रुपयांनी महागले. गुरुवारी, 21 मार्च रोजी 1,000 रुपयांची भरारी घेतली. 22 मार्च रोजी किंमती 450 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदी 2 हजारांनी स्वस्त – मार्चमध्ये सुरुवातीच्या दहा दिवसांत चांदी 3 हजारांनी उसळली. मागील आठवड्यात किंमती 2600 रुपयांनी वधारल्या. त्यात 900 रुपयांची घसरणही झाली. या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांची स्वस्ताई आली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. 20 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. तर 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 76,500 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 66,268 रुपये, 23 कॅरेट 66,003 रुपये, 22 कॅरेट सोने 60,702 रुपये झाले.18 कॅरेट 49,701 रुपये, 14 कॅरेट सोने 38,767 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,052 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us