AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 April 2024 : सोने वधारले, चांदीत स्वस्ताई, सराफा बाजारात अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 28 April 2024 : सोने आणि चांदीने दोन महिन्यात ग्राहकांचा चांगलाच घामटा काढला. या आठवड्यात मौल्यवान धातूने अनेक दिवसानंतर दरवाढीला ब्रेक दिला. सोन्याने आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भरारी घेतली. तर चांदीने दरवाढीनंतर विश्रांती घेतली.

Gold Silver Rate Today 28 April 2024 : सोने वधारले, चांदीत स्वस्ताई, सराफा बाजारात अशा आहेत किंमती
जेव्हा तुम्ही फीचर्समध्ये जाल, तेव्हा 'Verify HUID' हा पर्याय समोर येईल. या फीचरच्या मदतीने तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासता येईल. तुम्ही सोन्यावरील हॉलमार्क क्रमांक टाकल्यावर लागलीच कळेल की हॉलमार्किंग खरं आहे की खोटं.
| Updated on: Apr 28, 2024 | 8:33 AM
Share

या आठवड्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र पाहिले. गेल्या दोन महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांची बोबडी वळवली आहे. या धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत. दोन्ही धातूंची घौडदौड सुरु असताना या आठवड्यात तुफान दरवाढील खऱ्या अर्थाने ब्रेक लागला. इराण-इस्त्राईल यांच्यात युद्ध न भडकल्याने ही दरवाढ टळल्याचे मानले जात आहे. पण चीनमधील ग्राहक सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने जागतिक बाजारात भाव चढेच आहेत. आठवड्याच्या शेवटी सोन्याने ग्राहकांना दणका दिला. तर चांदीत घसरण आली. आता सराफा बाजारात सोने-चांदीच्या अशा आहेत किंमती…(Gold Silver Price Today 28 April 2024)

अखेरच्या सत्रात बॅटिंग

या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. या 5 दिवसांत सोने 2400 रुपयांनी घसरले तर 1150 रुपयांनी महागले. 22 एप्रिल रोजी किंमती 550 रुपयांनी उतरल्या. 23 एप्रिलला 1530 रुपयांची मोठी घसरण झाली. 24 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी वाढले. गुरुवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले. 26 एप्रिल रोजी 400 तर 27 एप्रिलला 200 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुसंडीनंतर चांदीची माघार

चांदीने दोन आठवड्यात मोठा दिलासा दिला. किंमती जैसे थे होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी स्वस्त झाली. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांची मोठी घसरण झाली. बुधवारी 100 रुपयांनी भाव उतरले. 25 एप्रिल रोजी चांदी 400 रुपयांनी घसरली. शुक्रवारी चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली. तर 27 एप्रिल रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,448 रुपये, 23 कॅरेट 72,158 रुपये, 22 कॅरेट सोने 66,362 रुपये झाले. 18 कॅरेट 54,336 रुपये, 14 कॅरेट सोने 42,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,374 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

9 वर्षांचे गणित काय?

वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट