AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 October 2024 : दिवाळीत सोने-चांदीचा मूड स्विंग; चढउताराच्या सत्राने ग्राहकांत कभी खुशी कभी गम

Gold Silver Rate Today 29 October 2024 : दिवाळीला बाजार फुलला आहे. अनेक ठिकाणी सवलतीच्या ऑफर्स ग्राहकांचे मन वेधून घेत आहेत. त्यातच दिवाळीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीचा भाव तळ्यात मळ्यात असा आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस भावात चढउताराचे सत्र दिसून आले.

Gold Silver Rate Today 29 October 2024 : दिवाळीत सोने-चांदीचा मूड स्विंग; चढउताराच्या सत्राने ग्राहकांत कभी खुशी कभी गम
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 29, 2024 | 9:13 AM
Share

सोने आणि चांदीच्या दरात दिवाळीपूर्वीच मोठी वाढ दिसली. त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन्ही धातुत नरमाई आली. ग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर या धातुंनी मोठा दिलासा दिला. अचानक दर घटल्याने ग्राहकांची पावलं सराफा बाजाराकडे वळाली. पण शुक्रवारी भावात 650 रुपयांची उसळी आली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत पडझड दिसली. आता मौल्यवान धातुच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 29 October 2024 )

दिवाळीत सोने झाले स्वस्त

गेल्या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्यात सोने जवळपास 1400 रुपयांनी वधारले. तर त्यात गेल्या गुरुवारी अचानक 600 रूपयांची घसरण दिसली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने जवळपास 490 रुपयांनी स्वस्त झाले. सोमवारी भाव घसरला. तर आज सकाळी सुद्धा घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,330 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा

मागील 15 दिवसांत चांदी जवळपास दहा हजारांनी वधारली होती. गेल्या आठवड्यात चांदी तीन हजार रुपयांनी महागली तर चांदीला 6,000 रुपयांचा फटका बसला. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या दरात कोणताच उलटफेर दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,245, 23 कॅरेट 77,932, 22 कॅरेट सोने 71,672 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,684 रुपये, 14 कॅरेट सोने 45,773 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,086 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक