AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत महायुतीत बंडखोरीचं पीक; पक्षाने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी बंडोबांनी दंड थोपटले

Mahayuti Rebel : तिकीट वाटपाचा कार्यक्रम जसजसा अंतिम टप्प्यात येत आहे. तसतशी बंडखोरांची संख्या वाढत आहे. यंदा चार पक्ष मैदानात आहेत. पण आघाडी आणि युती धर्मामुळे अनेकांना तिकीट वाटपात स्थान न मिळाल्याने त्यांनी मैदानात उतरून नाराजी जाहीर केली आहे. मुंबईत महायुतीत या ठिकाणी बंडोबांनी झेंडा फडकवला आहे.

मुंबईत महायुतीत बंडखोरीचं पीक; पक्षाने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी बंडोबांनी दंड थोपटले
बंडोबांचेअखरेच्या टप्प्यात आव्हान
| Updated on: Oct 29, 2024 | 8:54 AM
Share

जागा वाटपाचं कवित्व थोड्यात वेळात संपणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अनेकदा ताणल्या गेले. पण आता जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज झाले आहेत. आघाडी आणि युती धर्मामुळे अनेकांना तिकीट वाटपात स्थान न मिळाल्याने त्यांनी मैदानात उतरून नाराजी जाहीर केली आहे. मुंबईत महायुतीत या ठिकाणी बंडोबांनी झेंडा फडकवला आहे. मुंबईत महायुतीला काही मतदारसंघात तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. जर या बंडोबांना वेळीच समज दिली नाही. अथवा त्यांची समजूत काढली नाही तर काही जागा धोक्यात येऊ शकतात. मुंबईत या ठिकाणी महायुतीच्या डोक्याला ताप झाला आहे.

महायुतीत तीन ठिकाणी बंडखोरी

मुंबईत महायुतीत तीन ठिकाणी बंडखोर उमेदवार समोर आले आहेत. त्यात भाजप आणि शिंदे सेनाचा शिलेदारांनी बंडाळीची आरोळी ठोकली आहे. इच्छुक असतानाही पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधातच अपक्ष म्हणून उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही मतदारसंघात या बंडखोरांचा जनसंपर्क तगडा आहे. त्यांचे अनेक भागात व्यक्तिगत संबंध पण चांगले आहेत. त्या बळावर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.

या मतदारसंघात बंडखोरीचं पीक

मुंबादेवी इथून शायना एनसीविरोधात भाजपचेच अतूल शाह हे आज अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. पक्षाने त्यांच्या नावाचा विचार न केल्याने त्यांनी बंडखोरीचा नारा दिला आहे. या मतदारसंघात आता चुरस दिसणार आहे. तर बांद्रा पूर्व येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. आज सकाळी ९.३० वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दिसून येते. जिशान सिद्दीकी यांना सरमळकर यांचे आव्हान उभे असले. मातोश्रीच्या अंगणातच तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर मानखुर्द अणुशक्तीनगर येथे एनसीपीच्या सना मलिक विरोधात भाजपचे माजी नगरसेवक बबलू पांचाल यांची बंडखोरी केली आहे. आज ते शक्ती प्रदर्शन करतील. तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकून निलेश भोसले यांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीच्या तयारीत आहेत.  या मतदारसंघात ही तिरंगी लढत दिसेल.

Follow Us
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन