AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 September 2024 : सलग पाचव्या दिवशी सोने-चांदीची आनंदवार्ता; ग्राहकांना सणाच्या तोंडावर दिलासा, भाव तरी काय?

Gold Silver Rate Today 6 September 2024 : सोने आणि चांदीच्या आघाडीवर मोठी आंनदवार्ता आली आहे. या महिन्यात सलग पाचव्या दिवशी मौल्यवान धातूत कमालीची शांतता आहे. दोन्ही धातूत मोठी वाढ झालं नसल्याचे गुडरिटर्न्सच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे.

Gold Silver Rate Today 6 September 2024 : सलग पाचव्या दिवशी सोने-चांदीची आनंदवार्ता; ग्राहकांना सणाच्या तोंडावर दिलासा, भाव तरी काय?
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Sep 06, 2024 | 8:32 AM
Share

ग्राहकांना सलग पाचव्या दिवशी मौल्यवान धातूंनी दिलासा दिला. ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंमतीत मोठा बदल झालेला नाही. ऑगस्टच्या अखेरीस दोन्ही धातूत घसरणीचे सत्र होते. या आठवड्यात पण तसेच वातावरण आहे. गणपती बाप्पाचे आगमन होत असताना ही आनंदवार्ता आली आहे. सगळीकडे चैतन्यमय वातावरण आहे. मौल्यवान धातूंनी पण दिलासा दिला आहे. काय आहे सोने आणि चांदीची किंमत?(Gold Silver Price Today 6 September 2024 )

सलग पाचव्या दिवशी दिलासा

या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी सोन्यात मोठा बदल झाला नाही. गेल्या आठवड्यात घसरणीचे सत्र होते. या आठवड्यात 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सोने उतरले. 2 सप्टेंबर रोजी 270 रुपयांची घसरण दिसली. काल भावात बदल झाला नाही. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या किंमतीत नाही बदल

या आठवड्यात सोमवारी भाव स्थिर होता. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. काल चांदीच्या किंमतीत बदल दिसला नाही. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,875, 23 कॅरेट 71,587, 22 कॅरेट सोने 65,838 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,906 रुपये, 14 कॅरेट सोने 42,047 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 82,971 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा