AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7 January 2025 : नवीन वर्षात चला खरेदीला; सोने-चांदीत स्वस्ताई, आता काय किंमती?

Gold Silver Rate Today 7 January 2025 : नवीन वर्षात सोने-चांदीने सुरुवातीला महागाईचा कहर केल्यानंतर दुसर्‍या आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा दिला. सोमवारी ग्राहकांचा खिसा कापल्या गेला नाही. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 7 January 2025 : नवीन वर्षात चला खरेदीला; सोने-चांदीत स्वस्ताई, आता काय किंमती?
सोने-चांदी किंमत
| Updated on: Jan 07, 2025 | 9:13 AM
Share

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केला. दोन्ही धातुंनी महागाईचा गिअर टाकला. सोन्याने 1600 रुपयांची तर चांदीने किलोमागे 2 हजारांची झेप घेतली. या रॉकेट भरारीने ग्राहकांचा खिसा कापल्या गेला. या वर्षाच्या अखेरीस 90 हजारी सलामी देईल. तर चांदी 1 लाख 10 हजारांच्या घरात पोहचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर दुसर्‍या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातुच्या किंमतीत उसळी दिसली नाही. आता काय आहेत बेशकिंमती धातुचा दर? (Gold Silver Price Today 7 January 2025 )

रॉकेट भरारीनंतर सोन्यात शांतता

गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना घाम फोडला. सोन्याने 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली. त्यानंतर सोने अजून मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सोमवारी किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 1 हजारांनी स्वस्त

चांदीत मागील 15 दिवसात मोठी उलथापालथ दिसली नाही. तर 3 जानेवारी रोजी चांदीने 2 हजारांनी उसळली घेतली. तर 4 जानेवारीला 1 हजारांनी किंमत उतरली. त्यानंतर दोन दिवसांत कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,161, 23 कॅरेट 76,852, 22 कॅरेट सोने 70,680 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,871 रुपये, 14 कॅरेट सोने 45,139 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,152 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार