
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि बदलत्या घडामोडी याचा सोने-चांदीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. तात्पुरत्या काळासाठी सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळाले. पण दीर्घकाळाचा विचार केल्यास सोन्याने गुंतवणूकदरांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 52 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत. आगामी काळातही सोन्याचा भाव असाच वाढण्याची शक्यता वर्षाअखेर तो दीड लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भाववाढीची सध्याची स्थिती लक्षात घेता सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढू शकते. सोन्याचा भाव वर्षाअखेरपर्यंत तब्बल दीड लाखांपर्यंत तर चांदीचा भाव तब्बल पावने दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या कालावधीच तुलना करायची झाल्यास तुम्हाला सोन्याने किती रिटर्न्स दिलेले आहेत, हे लक्षात येईल. वर्षभराच्या काळात सोन्याच्या भावात 39040 रुपये म्हणजेच तब्बल 52.57 टक्क्यांनी वाढ झालेली असून सोन्याचा भाव आता 114,370 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. बरोबर एका वर्षापूर्वी हाच सोन्याचा भाव 75,330 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीबाबतही अशीच स्थिती आहे. चांदीच्या दरात एका वर्षात साधारण 50750 रुपयांनी म्हणजेच 55.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचा भाव 142,180 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. एका वर्षाआधी चांदीचा भाव 91,430 रुपये प्रति किलो होता. सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 105,353 लाख रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 114,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 142,180 प्रति किलोवर आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 22 आणि 24 सोन्याचा भाव अनुक्रमे 104,986 रुपये आणि 114,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 141,670 रुपये प्रति किलो आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 105,169 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 114,730 रुपये प्रति दहा ग्रॅम चालू आहे. तर मुंबई चांदीचा भाव 141,920 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कोलकाता शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 105,023 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 114,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 141,730 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे.