Gold Silver Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला; पटापट तपासा ताजे दर

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, यूएस बॉण्डचे कमी उत्पन्न आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमती पूर्वीच्या तोट्यातून सावरल्यात. त्याचबरोबर कोलकात्यात चांदीचा भाव 65,000 रुपये प्रति किलो झाला. सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगालच्या राजधानीत सोन्याचा भाव 48,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला; पटापट तपासा ताजे दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 5:48 PM

नवी दिल्लीः Gold Silver Rate Today : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 112 रुपयांनी वाढून 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या रिकव्हरीमुळे हे घडलेत. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. याउलट चांदीचा भाव 203 रुपयांनी घसरून 63,767 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहार दिवसात तो 63,970 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,803 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.12 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, यूएस बॉण्डचे कमी उत्पन्न आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमती पूर्वीच्या तोट्यातून सावरल्यात. त्याचबरोबर कोलकात्यात चांदीचा भाव 65,000 रुपये प्रति किलो झाला. सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगालच्या राजधानीत सोन्याचा भाव 48,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वायदे व्यवहारात गुरुवारी सोन्याचा भाव 18 रुपयांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरसाठी सोन्याचा भाव 18 रुपयांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी चांदीचा भाव 109 रुपयांनी घसरून 65,056 रुपये प्रतिकिलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरसाठी चांदीचा भाव 109 रुपयांनी घसरून 65,056 रुपये प्रतिकिलो झाला.

सोन्याची मागणी वाढली

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत वार्षिक 47 टक्क्यांनी वाढ झाली. जागतिक सुवर्ण परिषदेने एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक हालचाली वाढल्यामुळे आणि ग्राहकांच्या मागणीतील पुनर्प्राप्तीमुळे हे घडलेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्वीच्या पातळीवर परत येतेय आणि पुढे जाण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला दिसत आहे. 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशाची एकूण मागणी 94.6 टन होती. हे WGC च्या Q3 गोल्ड मागणी अहवालात नमूद केलेय. अहवालानुसार, मूल्याच्या बाबतीत भारताची तिसऱ्या तिमाहीतील मागणी 37 टक्क्यांनी वाढून 59,330 कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ते 43,160 कोटी रुपये होते.

संबंधित बातम्या

ICICI बँकेचं भारतीय लष्करातील जवानांसाठी विशेष खाते, थेट 50 लाखांचा अपघात विमा मिळणार

दिवाळी ऑफर! IRCTC Air वरून फ्लाइटचे तिकीट बुक करा आणि मिळवा अनेक फायदे!

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....