2022 मध्ये निर्यातीला येणार अच्छे दिन; पुढील वर्षी 530 अब्ज डॉलरच्या उलाढालीची अपेक्षा

निर्यातदारांची प्रमुख संघटना असलेल्या 'फियोने' पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निर्यातीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी भारताची निर्यात वाढून 530 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता असल्याचे फिओने म्हटले आहे.

2022 मध्ये निर्यातीला येणार अच्छे दिन; पुढील वर्षी 530 अब्ज डॉलरच्या उलाढालीची अपेक्षा
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली : निर्यातदारांची प्रमुख संघटना असलेल्या ‘फियोने’ पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निर्यातीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी भारताची निर्यात वाढून 530 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता असल्याचे फिओने म्हटले आहे. कोरोनाचा निर्यातीला मोठा फटका बसला होता. मात्र आता वाढते लसीकरण आणि झपाट्याने कमी होणारी कोरोना रुग्णांची संख्या यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. निर्यातदारांना मिळणाऱ्या ऑडरमध्ये विक्रमी वाढ झाली असून, पुढील वर्षात देशातून विविध वस्तुंची मोठ्या प्रमाणात निर्णयात होणार असल्याचे फियोने म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षात 130 अब्ज डॉलरची निर्यात

फियोचे अध्यक्ष ए शक्तिवेल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारताने आतापर्यंत 130 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. मात्र ही निर्यात अधिकाधिक कशी वाढवली जाईल यासाठी फीयोकडून प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षी निर्यात 400 अब्ज डॉलरने वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे पुढील वर्षी निर्यात ही 530 अब्ज डॉलरच्या आसपास जाऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वच क्षेत्रामध्ये तेजी दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डिसेंबर महिन्यात 36.2 टक्क्यांची वाढ

उद्योग व व्यापार मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार चालू महिन्यात डिसेंबरमध्ये निर्यातीत तब्बल 36.2 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलिय पदार्थ वगळता अन्य वस्तू व सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये चालू महिन्यात 28 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती उद्योग व व्यापार मंत्रालयाकडून देण्यात आली. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी निर्यात 40 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुढील वर्षी त्यामध्ये आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

Dry Day List 2022: नव्या वर्षात कधी कधी दारुची दुकाने बंद राहणार? ही लिस्ट जपून ठेवा

नववर्षात झारखंड सरकारचे नागरिकांना मोठे गिफ्ट, पेट्रोल होणार 25 रुपयांनी स्वस्त

ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.