AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dry Day List 2022: नव्या वर्षात कधी कधी दारुची दुकाने बंद राहणार? ही लिस्ट जपून ठेवा

देशात असे काही दिवस असतात, ज्या दिवशी दारूची दुकाने बद ठेवली जातात. अशा दिवसांना आपण ड्राय डे असे म्हणतो. जाणून घ्या 2022 मध्ये नेमके किती ड्राय डे येणार आहेत ते.

Dry Day List 2022: नव्या वर्षात कधी कधी दारुची दुकाने बंद राहणार? ही लिस्ट जपून ठेवा
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 12:22 PM
Share

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष आता लवकरच संपणार असून, 2022 चा उदय होणार आहे. लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. काही ठिकाणी तर नववर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये दारूचा देखील समावेश असतो. तर काही व्यक्ती हे नेहमी दारूचे सेवन करतात. अशा मद्यप्रेमींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतात विविध राज्यात दारू पिण्याचे नियम वेगवेगळे आहेत. काही राज्यांमध्ये दारू पिण्यावर  कडक निर्बंध आहेत, तर काही राज्यात सूट देण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्ये दारूवर भरमसाठ शुल्क आकारले जाते, तर काही राज्यामध्ये दारूला शुल्कामधून सूट देण्यात आली आहे. एवढेच नाही तर अनेक राज्यांमध्ये दारूचे दुकाने उघडण्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या आहेत.

वर्षभरात एकूण 21 ड्राय डे

मात्र आणखी एक महत्त्वाचे म्हणजे असे काही विशिष्ट दिवस असतात, ज्या दिवशी देशभरातील दारूची दुकाने ही बंद असतात. साधारणत: आपण अशा दिवसांना ड्राय डे म्हणतो. उदा: 2 ऑक्टोबरला ड्राय डे असतो. या दिवसी देशभरातील दारूची दुकाने बंद असतात. या दिवशी दुकाने सुरू ठेवल्यास दारू विक्रेत्याला दंड होऊ शकतो. आज आपन 2022 मध्ये कीती ड्राय डे येणार आहेत? याबद्दल जाणून घेणार आहोत. 2022 च्या एक जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत एकूण 21 ड्राय डे येणार आहोत, ज्या दिवशी दारूच्या दुकाना या पूर्णपणे बंद असणार आहेत. हे दिवस पुढील प्रमाणे

14 जानेवारी - मकर संक्रांती
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी - शहीद दिन
16 फेब्रुवारी - गुरु रविदास जयंती
19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
26 फेब्रुवारी - स्वामी दयानंद सरस्वती जयंती
1 मार्च -     महाशिवरात्री
18 मार्च -    होळी
14 एप्रिल -   डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती
15 एप्रिल -   गुड फ्रायडे
1 मे -       महाराष्ट्र दिन
3 मे -       ईद
10 जुलै -    बकरीईद 
15 ऑगस्ट -  स्वातंत्र्य दिन
19 ऑगस्ट -  जन्माष्टमी
31 ऑगस्ट -  गणेश चतुर्थी
9 सप्टेंबर -    गणेश विसर्जन
2 ऑक्टोबर -  महात्मा गांधी जयंती
5 ऑक्टोबर -  दसरा
24 ऑक्टोबर -  दिवाळी
8 नोव्हेंबर -   गुरु नानक जयंती
25 डिसेंबर -  ख्रिसमस
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.