EPFO: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! जुन्या कंपनीचे तोंडही पाहू नका, घर बसल्या PF काढा

EPFO E PRAAPTI Update : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. तुमच्या जुन्या पीएफ खात्यातील रक्कम आता काढता येईल. त्यासाठी ईपीएफओने एक नवीन पोर्टल तयार केले आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

EPFO: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! जुन्या कंपनीचे तोंडही पाहू नका, घर बसल्या PF काढा
ईपीएफओ, जुन्या खात्यातून काढा पीएफ
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 02, 2026 | 10:27 AM

EPFO E PRAAPTI Update : देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओ कार्यालाने लाखो कर्मचाऱ्यांचे अडकलेली पीएफ रक्कम खात्यातून काढण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे. एक डिजिटल पोर्टल केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुरू केले आहे. ईपीएफओने ई-प्राप्ती (E-PRAAPTI) हे पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याविषयीची घोषणा केली. ज्यांचा पीएफ खात्यात पैसा अडकलेला आहे. त्यांना आता आधार कार्डच्या (Aadhaar Card) मदतीने ही रक्कम काढता येईल.

जुन्या कंपनीची नाही गरज, ‘आधार’ मुळे थेट एंट्री

ई-प्राप्ती पोर्टल हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या आधारच्या (Aadhaar) मदतीने काम करेल. यापूर्वीचे जुने पीएफ खाते सक्रीय करण्यासाठी त्यांना कंपनी, मालक अथवा कोणत्याही कागदपत्रांची गरज उरणार नाही. अनेकदा जुन्या कंपन्या बंद होतात. अथवा एचआर मदत करत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पैसा अडकून पडतो. नवीन पोर्टल हे अवलंबित्व कमी करणार आहे. आता कर्मचारी थेट आधार ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून जुन्या खात्यातील पीएफ रक्कम काढता येईल. कोणत्याही मदतीशिवाय अथवा कंपनीच्या मदतीशिवाय पीएफ रक्कम काढता येणार आहे.

सदस्य आयडी तयार होईल

या नवीन डिजिटल सुविधेला अत्यंत व्यवस्थितपणे लागू करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात पोर्टल मुख्यपणे सदस्य ओळखपत्राआधारे (Member ID) काम करेल. ज्या सदस्याकडे जुने पीएफ खात्याचे सदस्य आयडी आहे. ते पोर्टलवर त्यांचे खाते शोधू शकतील. त्यानंतर ते सक्रीय करता येईल. जर तुम्ही जुनी आयडी विसरला असाल तर ते शोधण्याचे कामही हे पोर्टल लवकरच करून देईल. त्यासाठी अवघ्या काही सेकंदाचा वेळ लागेल. त्यामुळे सध्या ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि मेंबर आयडी आहे, त्यांना जुने खाते शोधता येईल. ते सक्रिय करता येईल आणि नंतर पैसेही काढता येतील.

UPI च्या माध्यमातून काढा पीएफ

एका दाव्यानुसार या मे महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रक्कम काढता येईल. कर्मचारी GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम काढू शकतील. ही रक्कम त्यांच्या लिंक्ड बँक खात्यात पीएफची रक्कम जमा होईल. या ऑनलाईन ॲपवर काही दिवसात ‘EPFO Withdrawal’ असा पर्याय मिळेल. कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातून एकदा पूर्ण पैसे काढू शकणार नाही. आता कमाल 75% रक्कम काढता येईल. तर 25% रक्कम पीएफ खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक असेल.

Follow Us