AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Today: भर उन्हाळ्यात गॅस दरवाढीचा भडका? इतक्या रुपयांनी महागणार घरगुती सिलेंडर, त्या दाव्याने एकच खळबळ

Domestic Cylinder Price: गेल्या महिन्यात 60 रुपयांनी घरगुती गॅस दरवाढ झाली. तर आता व्यावसायिक गॅस दरवाढीचा स्फोट झाला आहे. एकाच दमात 993 रुपयांनी व्यावसायिक सिलेंडर महागले. आता घरगुती सिलेंडर वाढ होण्याचा दावा करण्यात येत आहे.

LPG Price Today: भर उन्हाळ्यात गॅस दरवाढीचा भडका? इतक्या रुपयांनी महागणार घरगुती सिलेंडर, त्या दाव्याने एकच खळबळ
घरगुती गॅस दरवाढीचा भडकाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 02, 2026 | 8:40 AM
Share

LPG Price Today: गेल्या 15 वर्षात घरगुती गॅसच्या किंमती दुप्पटीहून अधिकने महागल्या आहेत. आता पुन्हा गॅस दरवाढीचे चटके ग्राहकांना सहन करावे लागू शकतात. गेल्या महिन्यात 60 रुपयांनी दरवाढ झाली. आता पुन्हा दरवाढीचा बॉम्ब पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक गॅस दरवाढीचा स्फोट झाला आहे. एकाच दमात सरकारने 993 रुपयांनी गॅस दरवाढ केली आहे. आता घरगुती गॅस दरवाढीचा नंबर असल्याचे समजते. 1 मे रोजी देशभरात कमर्शियल सिलेंडरचा भडका उडाल्याने हॉटेलिंग महागले आहे.

घरगुती गॅसची किती दरवाढ?

सूत्रांच्या माहितीआधारे एबीपी न्यूजने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 40 ते 50 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. अगोदरच सिलेंडरच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर झाल्या आहेत. 500 रुपयांच्या आत मिळणारे सिलेंडर आता थेट 1000 रुपयांच्या जवळपास आहे. त्यात अजून भर पडल्यास किचन बजेट कोलमडेल. अनेकांना चुलीचा आधार घ्यावा लागेल. शहरातील फ्लॅटमध्येही चूल पेटवावी लागणार का? असा संतप्त सवाल गृहिणी विचारत आहेत. येत्या आठवड्यात नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यावसायिक नंतर घरगुती गॅसचा क्रमांक

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक इंधन किंमतीवर अजून पडलेला नाही. सरकारने अनेक कर आणि उपकर कमी केल्याने थेट महागाईची झळ बसली नाही. पण आता जागतिक बाजारात किंमती वधारल्याने पेट्रोल-डिझेलही महागण्याची भीती व्यक्त होत आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी ट्वीट करत दरवाढीचे दावे फेटाळले आहेत. पण काही दाव्यानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरनंतर घरगुती गॅसची किंमत कधीही वाढू शकते.

व्यावसायिक सिलेंडरचा भडका

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा 1 मे रोजी भडका उडाला. एकाच झटक्यात 993 रुपयांनी किंमती भडकल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना हॉटेलचाही चेहरा पाहता येणार नाही. तर बाहेरगावी राहणाऱ्या नोकरदारांची खानावळ आणि हॉटेलिंगचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे बड्या शहरात काम करणाऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागणार आहे. तर पोलीस भरती, विविध परीक्षा, शाळा, महाविद्यालयं आणि विविध कोर्स करण्यासाठी बाहेर गावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा, नोकरदारांचा खर्च वाढणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी