Post office Scheme : अल्प बचतीवर जोरदार कमाई, पोस्ट ऑफिसची योजना बनवेल लखपती..

| Updated on: Dec 04, 2022 | 11:56 PM

Post office Scheme : अल्पबचत तुम्हाला काही दिवसातच लखपती करु शकते..

Post office Scheme : अल्प बचतीवर जोरदार कमाई, पोस्ट ऑफिसची योजना बनवेल लखपती..
मोठी कमाई
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली :अल्पबचत योजना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायच देत नाही तर उत्तम परताव्याची हमी पण देतात. या गुंतवणूक योजनेत तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक योजनेसारखी (SIP) गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक दरमहा केल्यास तुम्हाला काही वर्षानंतर जोरदार परतावा मिळतो. पब्लिक प्रोव्हिडंड फंडमध्ये (PPF) केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करते.

पीपीएफ योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेत व्याजदर हा इतर बचत योजनांमपेक्षा अधिक मिळते. ही योजना दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पीपीएफ योजनेत गुंतवणूक करतात.

एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 500 रुपये गुंतविता येतात. जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर दर महा 12500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदाराला मोठा फायदा मिळतो. 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.

PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. कित्येक बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. यामध्ये कंम्पाऊंडिंगचा फायदा मिळते. या योजनेत सिंगल अकाऊंट खाते उघडण्याची सोय आहे. लहान मुलांच्या नावे पण खाते उघडता येते.

पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढविता येतो. या योजनेतील गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. तुम्हाला कर सूट मिळविता येते. एवढंच नाही तर खात्याला एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्ध मिळविता येते.