लॉकडाऊनमध्ये कमाईची उत्तम संधी, घरबसल्या करा सरकारचे ‘हे’ काम आणि कमवा 50 हजार

| Updated on: May 18, 2021 | 4:44 PM

कॉन्टेस्टमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या वन-नेशन-वन रेशन कार्ड योजनेसाठी लोगो तयार करायचा आहे. सरकारने लोकांकडून यासाठी एन्ट्री मागितली आहे. आपण डिझाईनमध्ये तज्ज्ञ असाल तर लॉकडाऊनमध्ये ते आपल्यासाठी उत्पन्नाचे एक चांगले स्त्रोत बनू शकते. (Great opportunity to earn in lockdown, do this work of government at home and earn 50 thousand)

लॉकडाऊनमध्ये कमाईची उत्तम संधी, घरबसल्या करा सरकारचे हे काम आणि कमवा 50 हजार
Follow us on

नवी दिल्ली : गेले वर्षभर देश कोरोनाशी लढा देत आहे. कोरोना काळात रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामहारीचा नोकरी, उद्योगधंदे सर्वांनाचा फटका बसला आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या या योजनेचा फायदा घेत आपल्याला कमाईची उत्तम संधी मिळत आहे. सरकारने एक कॉन्टेन्स्ट सुरु केले आहे आणि यामध्ये आपण जिंकल्यास आपल्याला 50 हजार रुपये मिळतील. याची खासियत ही आहे की आपण घरबसल्या हे पैसे कमवू शकता. कॉन्टेस्टमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या वन-नेशन-वन रेशन कार्ड योजनेसाठी लोगो तयार करायचा आहे. सरकारने लोकांकडून यासाठी एन्ट्री मागितली आहे. आपण डिझाईनमध्ये तज्ज्ञ असाल तर लॉकडाऊनमध्ये ते आपल्यासाठी उत्पन्नाचे एक चांगले स्त्रोत बनू शकते. (Great opportunity to earn in lockdown, do this work of government at home and earn 50 thousand)

काय करावे लागेल?

आपल्याला वन-नेशन-वन रेशन कार्ड योजनेसाठी लोगो डिझाईन करायचा आहे. एकदा लोगोची रचना बनल्यानंतर ते निश्चित प्रक्रियेनुसार पाठवावे लागतात. लोगो डिझाईन करताना आपल्याकडून कॉपी राईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी एक व्यक्ती केवळ तीन वेळा प्रवेश अर्ज भरु शकते.

कसे मिळेल बक्षीस?

आपल्याकडून लोगो प्रविष्ट केल्यानंतर त्यातून लोगो निवडले जातात. त्यात निवड झालेल्या लोकांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. विजेत्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊन प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. तसेत दोन उपविजेत्यांना सरकारकडून केवळ प्रमाणपत्र दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी आपण 31 मे पर्यंत अर्ज करु शकता. ही कॉन्टेस्ट मे च्या सुरुवातीला सुरु केली आहे. My Gov India या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे.

कसा करायचा अर्ज?

वन नेशन वन रेशन कार्ड लोगो डिजाईन कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी सर्वप्रथम myGov.in पोर्टल वर जावे लागेल. येथे कॉन्टेस्टमध्ये जाऊन लॉग इन टू पार्टिसिपेट टॅब वर क्लिक करावे लागेल. यामध्ये रजिस्ट्रेशननंतर आपली एन्ट्री दाखल करावी लागेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

लोगो डिझाईन कॉन्टेस्टमध्ये सर्व वयाचे लोक सहभाग घेऊ शकतात. एक व्यक्ती सर्वाधिक तीन एन्ट्री करु शकतो. लोगोचा फॉर्मेट जेपीईजी, बीएमपी किंवा टीआयएफएफमध्ये हाय रिझोल्युशन (600 डीपीआय) इमेज असावी. लोगो हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा. लोगोबाबत 100 शब्दांची माहिती देणे आवश्यक आहे. (Great opportunity to earn in lockdown, do this work of government at home and earn 50 thousand)

इतर बातम्या

LIC ची खास पॉलिसी, दररोज 200 रुपयांची बचत करून 17 लाख कमवा

Mars: नासाच्या रोव्हरचं मंगळ ग्रहावरील काम सुरु, लेझरच्या सहाय्यानं जीवसृष्टीचा शोध घेणार