Holcim Cement : अदानी समूह होल्सिम लिमिटेड खरेदी करणार?, चर्चेला उधान, शेअर्सच्या किंमतीतही वाढ

| Updated on: Apr 26, 2022 | 2:49 PM

अंबुजा आणि एसीसी सिमेंटची सिस्टर कंपनी असलेल्या होल्सिम लिमिटेड आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. काय आहे नेमकं कारण?

Holcim Cement : अदानी समूह होल्सिम लिमिटेड खरेदी करणार?, चर्चेला उधान, शेअर्सच्या किंमतीतही वाढ
गौतम अदानी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : अंबुजा (ambuja cement) आणि एसीसी (ACC) सिमेंटची सिस्टर कंपनी असलेल्या होल्सिम लिमिटेड (holcim cement) आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या मार्गावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे हा भलामोठा उद्योग खरेदी करण्याच्या शर्यतीत गौतम अदानी यांचा समूह सहभागी आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अदानी समुह भारतात होल्सिम लिमिटेड कंपनीचा व्यवसायाचं अधिग्रहण करण्यासाठी बोलणी करत आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे याचसंदर्भात अदानी समुह येत्याकाळात एक करारही करण्याच्या तयारीत आहे. आता असं असलं तरी यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर फक्त चर्चा होतायेत. दरम्यान, या कराराकडे उद्योग जगताचं लक्ष लागून आहे. कारण, होल्सिम लिमिटेड ही अंबुजा आणि एसीसी सिमेंटची सिस्टर कंपनीचाच एक भाग आहे.

कंपनीचा बोलण्यास नकार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू समुहासह इतर अनेक दिग्गज समूह आणि कंपन्यांना देखील या व्यवहारात स्वारस्य आहे. आता या पूर्ण व्यवहारावर किंवा यासंदर्भात होल्सिम आणि जेएसडब्ल्यू समूहाने यावर बोलण्यास नकार दिला नाही. पण, त्यावर ते काही बोलत देखील नाहीये. त्यामुळे कुठेतरी संशयासी सुई असून हा व्यवहार चालू असल्याचं बोललं जातंय. होस्लिम कंपनीचं 63.1 टक्के भागावर नियंत्रण आहे. त्यामळे ही कंपनी आपल्या भागिदारीची विक्री करण्यावर विचार करत आहे. अंबुजाच्या इतर कंपन्यांमध्ये एसीसी सिमेंट देखील सहभागी आगहे.

शेअर्समध्ये मोठा फरक

जेएसडब्ल्यू समुहासह इतर अनेक दिग्गज समूह आणि कंपन्यांना देखील या व्यवहारात स्वारस्य असल्याचं कळताच. शेअर्स बाजारात मोठा फरक दिसून आला. अंबुजाचे शेअर्सचा भाव 1.78 टक्के वाढला आणि 383.30 रुपयावर तो पोहचला. एसीसी चे शेअर्सची किंमत 1.52 टक्क्यांनी वाढून 2294.60 रुपये इतकी झाली आहे. या महिन्यात अंबुजाचे शेअर्स जवळपास 26 टक्क्यांनी वाढले आहे.

अदानींना होस्लिममध्ये स्वारस्य?

अदानी समुह भारतात होल्सिम लिमिटेड कंपनीचा व्यवसायाचं अधिग्रहण करण्यासाठी बोलणी करत आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे याचसंदर्भात अदानी समुह येत्याकाळात एक करारही करण्याच्या तयारीत आहे. आता असं असलं तरी यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर फक्त चर्चा होतायेत. दरम्यान, या कराराकडे उद्योग जगताचं लक्ष लागून आहे. जेएसडब्ल्यू समुहासह इतर अनेक दिग्गज समूह आणि कंपन्यांना देखील या व्यवहारात स्वारस्य आहे. आता या पूर्ण व्यवहारावर किंवा यासंदर्भात होल्सिम आणि जेएसडब्ल्यू समूहाने यावर बोलण्यास नकार दिला नाही.