world richest people List : अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गेल्या वर्षभरात संपत्तीमध्ये ‘इतकी’ वाढ

उद्योग जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. अदानी समुहाचे (Adani Group) संस्थापक आणि अध्यक्ष असलेले गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रींमत तर जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

world richest people List : अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गेल्या वर्षभरात संपत्तीमध्ये 'इतकी' वाढ
गौतम अदानी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 3:29 PM

उद्योग जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. अदानी समुहाचे (Adani Group) संस्थापक आणि अध्यक्ष असलेले गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रींमत तर जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. नुकतीच फोर्ब्सकडून रिअल-टाईम अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार गौतम अदानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान पटकला आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ही 87.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांची एकून संपत्ती ही 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, ते वर्षभरात सर्वाधिक संपत्ती वाढलेले व्यक्ती देखील ठरले आहेत.

अदानी यांची एकूण संपत्ती किती?

फोर्ब्सकडून रिअल-टाईम अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. वर्षभरात त्यांच्या खासगी संपत्तीत एकूण 12 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ते याचबरोबर वर्षभरात सर्वाधिक संपत्ती वाढलेले व्यक्ती देखील ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. त्यांनी याबाबतीत आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असेलेल्या मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. त्यांनी केवळ मुकेश अंबानी यांनाच नाही तर वॉरन बफे यांना देखील अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले असून, त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. तर वॉरन बफे यांची एकूण संपत्ती ही 121.7 अब्ज डॉलर इतकी आहे.

शेअर्समध्ये 600 टक्क्यांची वाढ

गेल्या दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत 600 टक्क्यांनी वाढली आहे, अदांनी समुहाची प्रमुख गुंतवणूक ही बंदर क्षेत्रात आहे. अनेक प्रमुख बंदरे ही अदानी समुहाच्या मालिकीची आहेत. तसेच अदानी ग्रुप हा पर्यावरण क्षेत्रात देखील काम करत असून, येत्या 2070 पर्यंत भारताला कार्बनमुक्त बनवण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीकडू हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Share Market Updates : शेअर बाजारातील पडझड कधी थांबणार? आज पुन्हा एकदा सेन्सेक्स 700 अंकानी घसरला; गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी

जीएसटीची पुन्हा लगीनघाई; नवीन वऱ्हाडींची सरबराई, 28 टक्के जीएसटीतंर्गत 143 वस्तुंचा समावेश होणार

Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.