AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हेरी गुड! गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे काम, बँकेकडून मागा ही 9 कागदपत्रं, यादीच पाहा

Home Loan Foreclosure : आयुष्यात घराचं स्वप्न पू्र्ण करणे सोपे नाही. कर्ज घेऊन अनेक जण घर खरेदी करतात. त्यासाठी 20-30 वर्षांचा मोठा कालावधी निघून जातो. गृहकर्ज फेडले असेल तर हे काम झटपट करणे आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज प्रकरण बंद केल्यावर ही 9 कागदपत्रं घेण्यास अजिबात विसरू नका.

व्हेरी गुड! गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे काम, बँकेकडून मागा ही 9 कागदपत्रं, यादीच पाहा
व्हेरी गुड! गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे कामImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 19, 2026 | 7:58 PM
Share

घर पाहावे बांधून असे म्हटले जाते. पण हे स्वप्न साकारणे तितके सोपे नाही. अनेक जण बँकेकडून कर्ज घेऊन त्यांच्या स्वप्नातील आशियाना पूर्ण करतात. कर्ज रक्कम फेडण्यासाठी 20 ते 30 वर्षांचा कालावधी मिळतो. घराचा हप्ता फेडताना जवळपास अर्धे आयुष्य निघून जाते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मार्च, 2023 मध्ये कर्जदारांवर 19,36,428 कोटींचे गृहकर्ज होते. कर्ज घेण्याचे प्रमाण वर्षाला 15 टक्क्यांनी वाढले आहे. कर्ज फेडणे हे काही सोपे काम नसते. नियमित परतफेड केल्यास कर्ज लवकर फिटते. कर्ज बंद केल्यावर खरी कसोटी सुरू होते. बँकेकडून कर्ज प्रकरण बंद केल्यावर ही 9 कागदपत्रं घेण्यास अजिबात विसरू नका.

हे अजिबात विसरू नका

कर्ज परतफेड केल्यानंतर सर्वात अगोदर बँकेकडे तुमची मूळ कागदपत्रं मागायला अजिबात विसरू नका. कर्ज देताना तारण म्हणून बँका ही कागदपत्रं जमा करून घेतात. तारण देण्यात आलेली कागदपत्रं कर्ज फेड करताच बँकेकडे मागा. त्यातील एखादं कागदपत्रं गहाळ आहे का? याची खातरजमा करा. यामध्ये

जमिनीची रजिस्ट्री

पॉवर ऑफ अटॉर्नी

कर्ज करार पत्र

सेल डीड

जागेचा भू नकाशा

टायटल डीड

ही कागदपत्रे नीट आणि व्यवस्थित तपासून घ्या. यातील कागदपत्रे हरवली, गहाळ झाली का, एखादा महत्वाचा कागद आहे की नाही? त्यातील कागदपत्रे फाटली अथवा खराब तर झाली नाही ना, याची खातरजमा करा.

कर्जाचा बोजा हटवा

वाहनावरील कर्ज फेडल्यानंतर आपण प्रादेशिक परिवहन खात्यात जाऊन बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करतो. हे प्रमाणपत्र दाखल झाल्यानंतर वाहनावरील कर्जाचा बोजा हटतो. म्हणजे कारवर आता बँकेचे कर्ज नसल्याची ती एक प्रकारची पावतीच असते. असाच प्रकार हा गृहकर्जाविषयी आहे. कर्ज फेड केल्यानंतर तुमच्या जागेवर कुठलेही कर्ज नाही असा दाखला बँक देते. हा दाखला तहसील कार्यालय, नोंदणी विभागात सादर केल्यानंतर तुमच्या जागेवरील कर्जाचा बोजा हटतो. यामुळे भविष्यात तुम्हाला जागा विक्री करायची असेल, फ्लॅट, घर, सदनिका, बंगला, प्लॉट, भूखंड विक्री करायचा असेल तर कोणताही कायदेशीर अडचण येत नाही. या मालमत्तेवरील बँकेचा बोजा हटतो.

धनादेश मागायला विसरू नका

कर्ज फेड करताना एखादा ईएमआय चुकू नये यासाठी बँका कर्जदाराकडून धनादेश मागवतात. एखादा ईएमआय बाकी असेल तर बँक आगाऊ सूचना देऊन ही रक्कम वळती करते. पण जर तुमच्याकडे कोणताही हप्ता थकीत नसेल तर मात्र हा सुरक्षा धनादेश बँकेकडून परत मागण्यास विसरू नका. नाहीतर त्याचा चुकीचाही वापर होऊ शकतो. यासोबतच ना हरकत प्रमामपत्र सुद्धा मागा. नो ड्यूज सर्टिफिकेटचा अर्थ असा की तुमच्याकडे बँकेचा नवीन पैसा ही थकीत नाही. कर्ज फेडल्यावर लागलीच बँकेकडे नो ड्यूज सर्टिफिकेटची मागणी करा. ते सुद्धा अगोदर तपासून बघा.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात