Building Materials: सळई, सिमेंटसह वीट ही झाली स्वस्त, भाव वाढण्यापूर्वीच घराचं स्वप्न करा साकार, काय आहेत भाव? जाणून घ्या

| Updated on: Jul 05, 2022 | 7:15 PM

Saraiya Rate Today: घर तयार करण्याची शिदोरी अर्थात बांधकाम साहित्य मार्च ते एप्रिल महिन्यात खूप वाढले होते. परंतू आता सळई, सिमेंट आणि वीट ही स्वस्त झाली आहे. त्यामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होणार आहे.

Building Materials: सळई, सिमेंटसह वीट ही झाली स्वस्त, भाव वाढण्यापूर्वीच घराचं स्वप्न करा साकार, काय आहेत भाव? जाणून घ्या
बांधकाम साहित्य स्वस्त
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

देशभरात मान्सूनने (Manson) डेरा टाकला आहे. जून कोरडा गेल्यावर आता जुलै महिन्याकडून मोठ्या आशा लागल्या आहेत. पावसाळ्याचा थेट परिणाम होतो तो घराच्या बांधकामांवर (Construction Sector). पाऊस पडल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे थंडावतात. पावसाळ्यात बांधकाम क्षेत्रासाठी लागणारी वाळू(Sand), सिमेंट(Cement) आदींची कमतरता सुरु होते. परिणामी यांच्या भावात चांगलीच वाढ (Price Hike) होते. नदीला पूर आल्याने वाळूही भेटत नाही. त्याचा ही परिणाम बांधकामांवर दिसून येतो. वाळू आणि सिमेंटचे दर वाढतात. बांधकाम साहित्य (Building Materials) मार्च ते एप्रिल महिन्यात खूप वाढले होते. गेल्या महिन्यात देशातील विविध शहरात सळईचा भाव 4500 रुपये प्रति टन महाग होता. त्यानंतर भावात कमालीची घसरण झाली. परंतू आता सळई, सिमेंट आणि वीट ही स्वस्त झाली आहे.अजून मान्सूनने देशाच्या काही भागात अजूनही ओढ दिली आहे. जून महिना तर मान्सूनची वाट पाहण्यात गेला. जुलै महिन्याच्या 5 दिवसातही अजून पावसाने काही भाग वगळता जोर दाखवलेला नाही. त्यामुळे या काळात तुम्ही घर बांधायला सुरुवात केली असेल तर दर वाढण्यापूर्वी त्वरीत बांधकाम साहित्य खरेदी करा, नाहीतर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात भावात होते वाढ

घराचे बांधकाम करताना साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ होते. वीट, सळई आणि सिमेंटच्या किंमतीत वाढ होते. मार्च ते एप्रिल महिन्यात बांधकाम साहित्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र किंमतींनी नांगी टाकली. विशेषताः सळईचे भाव झपाट्याने उतरले. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सळईची दर घसरण सुरुच आहे. सळईचे म्हणाल तर भाव निम्म्यावर आले आहेत. परंतू पावासाची चाहुल लागताच भाव वधरले. तेव्हापासून भाव तेजीने वाढत आहे. परंतू अजूनही सळईचा भाव उच्च पातळीवर गेला नाही. त्यामुळे घराचे काम काढले असेल तर येत्या काही दिवसात ते तातडीने पूर्ण करण्यासाठी सळई स्वस्तात विकत घेण्याचा पर्याय अजून ही खूला आहे.

हे सुद्धा वाचा

जूनमध्येच तेजीचे वारे

मार्च महिन्यात देशातील काही भागात सळईच्या किंमती 85 हजार रुपये टनापर्यंत गेल्या होत्या. सध्या देशातील विविध शहरात सळईचा भाव 49,000 ते 59,000 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर सळईचे भाव तूटले आणि मध्यावर आले. सळई 44 हजार रुपये प्रति टन झाले. सध्या अनेक शहरात सळईच्या भावात प्रति टनामागे 1100 ते 4500 रुपयांची तेजी पहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा विचार करता नागपूर (Nagpur) शहरात सळईचा भाव हा जून महिन्यात 51,000 रुपये होता. तो जुलै महिन्यात 3,200 रुपयांनी वाढून जुलै महिन्यात 54,200 रुपये झाला आहे. तर सळईचे मोठे उत्पादन जिथे होते ती सळईची पंढरी जालना (Jalna) शहरात जून महिन्यात सळईचे भाव 54,000 रुपये होते तर जुलै महिन्यात या किंमतीत 1100 रुपयांची वाढ होऊन या किंमती 55,100 रुपये प्रति टन झाल्या आहेत. राजधानी मुंबईचा (Mumbai) विचार करता, जून महिन्यात सळई प्रति टन 55,200 रुपये दराने मिळत होती. त्यात 400 रुपयांची घट झाली असून भाव प्रति टन 54,800 रुपये झाले आहेत.