
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झालं आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध चांगले आहेत. अनेक भारतीय कंपन्यांची इस्रायलमध्ये गुंतवणूकही केलेली आहे. मात्र आता युद्धामुळे या कंपन्यांची चिंता वाढली आहे.
भारत इराणसह मध्य पूर्वेतील अनेक देशांमधून तेल खरेदी करतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि चलनावर वाईट परिणाम होऊ शकतो. आज आपण 500 भारतीय रुपयांचे मूल्य या दोन्ही देशांमध्ये किती होते ते जाणून घेणार आहोत.
इराण आणि इस्रायलचे चलन
इराणच्या चलनाची स्थिती भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप वाईट आहे. इराणच्या चलनाचे नाव इराणी रियाल असे आहे. सध्या भारताचा एक रुपया इराणच्या 488.10 रियाल इतका आहे. इराणच्या रियालच्या तुलनेत भारताचा रुपया किती मजबूत आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. जर तुमच्याकडे 500 भारतीय रुपये असतील तर ते इराणमध्ये 2 लाख 43 हजार रुपये बनतात, म्हणजे तुम्ही 500 रुपयांमध्ये लखपती बनू शकतात.
इस्रायलच्या चलनाचे नाव न्यू शेकेल असे आहे, जे भारताच्या रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत आहे. एक इस्रायली शेकेल खरेदी करण्यासाठी भारताला 24-25 रुपये मोजावे लागतात. तुमच्याकडे 500 भारतीय रुपये असतील तर ते इस्रायली चलनात फक्त 20 रुपये बनतात.
इराण आणि इस्रायलमध्ये 100 रुपयांची किंमत किती?
भारतीय चलनाते इस्रायलच्या शेकेलमध्ये रुपांतर केल्यास तुम्हाला खूप कमी पैसे मिळतील. जर तुम्ही 100 भारतीय रुपयांचे इस्रायली चलनात रूपांतर केले तर तुम्हाला केवळ 4 शेकेल मिळतील. 1000 रुपयांचे इस्रायली चलनात रूपांतर केले तर तुम्हाला फक्त 40 शेकेल मिळतील.
दुसरीकडे तुम्ही इराणला गेलात तर तिथे परिस्थिती पूर्णपणे उलट असेल. इराणच्या तुलनेत रुपयाची स्थिती खूप मजबूत आहे. तुम्ही भारतीय चलन इराणच्या चलनात बदलले तर तुम्हाला खूप जास्त पैसे मिळतात. तुम्हाला 100 रुपयांच्या बदल्यात 48,810 इराणी रियाल मिळतील. जर एखाद्या व्यक्तीने 1000 रुपये बदलले तर त्याला 4,88,104 इराणी रियाल मिळतील.