आज रेल्वेने प्रवास करा, नंतर पैसे द्या, नवी स्कीम काय ?

IRCTC Book Now, Pay Later Scheme: आज आम्ही तुम्हाला रेल्वेची एक खास स्कीम सांगणार आहोत. या स्कीम किंवा योजनेअंतर्गत तुम्ही कोणतेही पेमेंट न करता तिकीट बुक करू शकता आणि 14 दिवसांच्या आत तिकिटाची संपूर्ण रक्कम भरू शकता. वेळेवर पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

आज रेल्वेने प्रवास करा, नंतर पैसे द्या, नवी स्कीम काय ?
| Edited By: | Updated on: Jan 24, 2025 | 3:40 PM

IRCTC Book Now, Pay Later Scheme: आज आम्ही तुम्हाला रेल्वेची एक खास स्कीम सांगणार आहोत. रेल्वे प्रवास सुरळीत आणि आनंददायी व्हावा यासाठी रेल्वे दिवसेंदिवस एक पाऊल उचलत आहे. नुकतीच रेल्वेने आणखी एक नवी स्कीम आणली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार आहे. या नव्या स्कीमविषयी जाणून घेऊया.

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल पण तिकीट बुक करताना तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने ‘बुक नाऊ, पे लेटर’ नावाची नवी स्क्रीम सुरू केली आहे. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

वेळेवर पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

या स्कीमअंतर्गत तुम्ही कोणतेही पेमेंट न करता तिकीट बुक करू शकता आणि 14 दिवसांच्या आत तिकिटाची संपूर्ण रक्कम भरू शकता. वेळेवर पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, पैसे देण्यास उशीर झाल्यास 3.5 टक्के सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे.

‘पे लेटर’ स्कीमचा फायदा कसा घ्यावा?

या स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या IRCTC खात्यात लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ‘बुक नाऊ’ या पर्यायावर क्लिक करा आणि प्रवासी तपशील भरा आणि सबमिट करा. यानंतर पेमेंट पेज ओपन होईल. येथे तुम्हाला क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल.

‘पे लेटर’ हा पर्याय वापरायचा असेल तर सर्वप्रथम epaylater.in जाऊन नोंदणी करावी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पैसे भरण्याचा पर्याय मिळेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अ‍ॅडव्हान्स पेमेंटशिवाय तिकीट बुक करू शकाल.

14 दिवसांच्या आत पैसे भरावे लागतील

हे लक्षात ठेवा की, तिकीट बुक केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पैसे भरणे आवश्यक आहे. मुदतीत पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, परंतु देयकास उशीर झाल्यास 3.5 टक्के सेवा शुल्क आकारले जाईल.

स्कीम नेमकी कुणासाठी बनवण्यात आली?

ही स्कीम विशेषतः अशा प्रवाशांसाठी फायदेशीर आहे जे अचानक प्रवास करण्याचा निर्णय घेतात, परंतु त्यांच्याकडे तात्काळ तिकिटासाठी पैसे नसतात. या नव्या स्कीमद्वारे भारतीय रेल्वेने प्रवास अधिक सोयीस्कर आणि लवचिक केला आहे.

आम्ही तुम्हाला रेल्वेच्या या स्कीमबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. आता तुम्ही याचा गरजेनुसार वापर करू शकता.