Petrol Pump : पेट्रोल पंपावर वाहनधारकांची अशी पद्धतीशीर होते लूट..रहा सजग, नाहीतर खिशाला बसेल फटका..

| Updated on: Nov 19, 2022 | 6:50 PM

Petrol Pump : पेट्रोल पंपावरच्या लुटीपासून वाचायचं असेल तर हे वाचाच..

Petrol Pump : पेट्रोल पंपावर वाहनधारकांची अशी पद्धतीशीर होते लूट..रहा सजग, नाहीतर खिशाला बसेल फटका..
लूट थांबवा अशी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, पेट्रोल पंपावर (Petrol Pump) वाहनधारकांची (Vehicle Owner) लूट (Loot) करण्यात येते. ग्रामीण भागात त्याला काटा मारणे असा शब्द वापरण्यात येतो. फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्रीय तेल आणि वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दावा केला होता की, दिल्लीतील पेट्रोलपंपावर वाहनधारकांची सर्वाधिक लूट होते. कमी इंधन भरून ग्राहकांना लुटण्यात येते.

तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर थोडी सजगता दाखवली तर तुम्हाला पेट्रोलपंपावरील लोक लूटू शकत नाहीत. त्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

देशभरातील पेट्रोल पंपावर कमी तेल देण्याचे (Short Selling) अनेक प्रकार समोर आले आहेत. अशावेळी जर तुम्हाला पेट्रोल पंपावर लूट होऊ नये असे वाटत असेल तर सजग रहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

पेट्रोलपंपावरील व्यक्तीने अगोदरच्या वाहनात पेट्रोल टाकल्यानंतर फिलिंग मशीनचे रीडिंग पुन्हा झिरो केले की नाही, हे तपासा. त्याने तसे केले नसल्यास, त्याल्या तसे करण्यास भाग पाडा. जर तुम्ही असे केले नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.

ग्राहकाला इंधन भरल्यानंतरही समाधान न झाल्यास त्याला इंधनाची तपासणी करता येते. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने कमी पेट्रोल-डिझेल दिल्यास, तुम्हाला 5 लिटर इंधनाची तपासणी करता येते. त्याआधारे इंधन कमी भरले की जास्त याचा पडताळा घेता येतो.

तुम्हाला शंका आल्यास, पेट्रोल पंप धारकाला तुम्ही 5 लिटर प्रमाण चाचणीसाठी आग्रह धरू शकता. जर मशीनमध्ये 5 लिटरची मात्रा पूर्ण होत नसेल तर पेट्रोल कमी असल्याची खात्री पटते. याविषयीची तक्रार तुम्हाला करता येते.

इंधन भरताना नेहमी मीटरवर लक्ष ठेवा, मीटर रीडिंग झिरो असल्याची खात्री करुन घ्या. इंधन भरताना इकडे-तिकडे लक्ष न देता, मीटरवर लक्ष ठेवा. तसेच फ्यूअल नॉझिलवरही लक्ष ठेवा.